आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्यूज च्या उपसंपादक दिपक मानकर यांच्या पाठपुराव्यामुळे शिराळा मानकर वाडी एसटी सेवा पूर्ववत चालू
प्रतिनिधि सांगली
सांगली ( शिराळा) :- गेल्या पंधरा दिवसांपासुन आंबेवाडी ते वाकुर्डे रस्त्यामुळे येथील एसटी सेवा एसटी महामंडळाने रस्ता खराब असल्याचे कारण देत मानकर वाडी मार्गे जाणारी एसटी बंद केली होती. त्यामुळे जनतेचा तालुक्यामधील (बाजारपेठेचा) संपर्क पूर्णपणे तुटला होता. यामुळे वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी यांना खूप त्रास सहन करावा लागला . एखाद्याला अचानक गंभीर आजार झाला तरी हॉस्पिटलमधे घेऊन जाण्यासाठी सुद्धा गाडी मिळू शकत नव्हती. त्यातच एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांचे खूप हाल झाले. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्यूजचे उपसंपादक श्री. दिपक मानकर यांनी तत्काळ शिराळा तालुक्याच्या एसटी महामंडळाच्या श्री. राहुल पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक, शिराळा आगार यांना घटनेचे गांभीर्य लक्षात 
आणून देऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये आबालवृद्धांना, शालेय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून विनंती केली तरी मानकर यांच्या विनंतीवरून श्री. राहुल पाटील साहेबांनी तात्काळ घटनास्थळील विभागाची पाहणी करून संबंधित विभागाची एसटी चालू करण्याचे आदेश चालक व वाहकांना दिले आणि एसटी सेवा पूर्ववत सुरू केली त्यामुळे नागरिकांनी श्री. राहुल पाटील साहेब, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक, शिराळा आगार यांचे खूप खूप आभार मानले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













