जागतिक योग दिनानिमित्त प्रमोद महाजन पार्क येथे मोठ्या संख्येने साधकांनी उपस्थित राहून योग साधना केली
मुंबई प्रतिनीधी: महेश कदम
मुंबई :- पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. तन,मन,आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग आयुष्यात समतोल घेऊन येतो.

जागतिक योग दिनानिमित्त प्रमोद महाजन पार्क दादर, मुंबई येथे दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आले, हा दिवस आता जगभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. प्रमोद महाजन पार्क येथे योग दिनानिमित्त मोठ्या संख्येने योग साधकांनी 
उपस्थित राहून योग साधना केली. या मध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती. सुरवातीस प्रार्थना होऊन, सर्वांनी सूर्यनमस्कार घातले. यानंतर योगासने, प्राणायाम, सिंहमुद्रा, हास्ययोग अशा क्रमाने योग साधना पार पडली. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थरावर सुस्थिर स्थिती म्हणजे आरोग्य ही आरोग्याची व्याख्या श्री. हेमंत लांबे यांनी समजावून सांगितली. असे आरोग्य 
प्राप्त करण्यासाठी सातत्याने योगसाधना करणे आवश्यक आहे असे ही श्री. लांबे यांनी प्रतिपादन केले. श्री. जितेंद्र कांबळे यांनीही योगसाधनेचे महत्व सांगितले, डॉ. नीला यांनी योग आणि आरोग्य या बाबत आपले विचार मांडले. श्री. अशोक चिवटे, श्री गुप्ताजी यांनीही आपले योगदान दिले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













