नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पि .के दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पि .के दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री पि के दरेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवार दिनांक २१/०६/ २०२३ रोजी योग प्रात्यक्षिक व योगाचे महत्व विशद करून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

   इयत्ता आकरावी व बारावीच्या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींनी योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला. प्रशाळेतील उच्च माध्यमिक विभागातील श्री शशिकांत सावंत सर, सौ. स्वाती खेडेकर मॅडम ,सौ .सिद्धी देवळेकर मॅडम यांनी योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून योग आसने करुन घेतली. माध्यमिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांना सौ दळवी मॅडम, सौ बेंडल मॅडम श्री कावणकर सर यांनी योगाचे महत्व सांगून व योगासने प्रात्यक्षिके करून घेतली.

     या कार्यक्रमासाठी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री माळी सर तसेच प्राथमिक, माध्यमिक ,ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]