नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रहार तर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत बेमुदत उपोषण – आजचा महाराष्ट्र

प्रहार तर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत बेमुदत उपोषण

प्रतिनीधी मुंबई

मुंबई:-दिव्यांग शासकीय- निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना मुंबई ११ संघटनेचे राज्याध्यक्ष श्री रविंद्र सोनवणे, श्रीमती भक्ती भंडारी व सर्व राज्य पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर ज. जी. समूह रुग्णालय व ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ५० ते ६०दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बेमुदत उपोषण.

१)दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पदनिहाय सेवा जेष्ठता यादी ,पदनिहाय बिंदूनामावली व ४%दिव्यांग पदोन्नती अनुशेषा तात्काळ भरणे.

२) दिव्यांग कर्मचाऱ्यांना ७सप्टेंबर २०११ च्या शासन निर्णयान्वये निम्म्यादराने दिव्यांग वाहतूक भत्ता एप्रिल २०२२ पासून तात्काळ लागू करणे .

३) दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार सहाय्य तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध करून देणे.

४) दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग हक्क कायदा २०१६ कलम २० नुसार हलक्या स्वरूपाचे/ सोयीचे काम देणेबाबत.

५) दिव्यांग कर्मचारी श्री गणेश नर यांच्यावर निवासस्थान वाटपावर झालेल्या अन्याय तात्काळ दूर करणे.

६) दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नियुक्ती करणे.. व नावाचा फलक प्रदर्शनी भागात लावावा .

७) दिव्यांग हक्क कायदा २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे.

८) प्रत्येक इमारतीत दिव्यांग कर्मचाऱ्यांना ४% निवासस्थानात प्रथम प्राधान्य देण्यात यावा.

या प्रमुख मागण्यासाठी आज सर जे जे रुग्णालय मुंबई येथे मा. आमदार बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हक्काच्या मागण्या साठी दिव्यांग कर्मचारी उपोषणास बसले आहेत त्यावेळी स. जे. जे रुग्णालय कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. काशिनाथ राणे सचिव श्री. यशवंत दळवी, श्री.महेश चव्हाण, श्री संजय हजंणकर, श्री किशोर शेलार, श्रीमती शारदा येवले, तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुरेश तांबे, कृती समितीचे संघटक श्री दीपक लाड, श्रीमती हेमलता गजबे यांनी प्रत्यक्षात जाऊन उपोषणास बसलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]