तिर्थक्षेत्र जाळीचादेव यात्रेनिमित्त पोलीस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे यांनी भेट देऊन मंदिराची केली पाहणी

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्री तिर्क्षक्षेत्र जाळीचादेव यात्रा महोत्सवाला दिनांक २ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून या निमित्त आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व भोकरदनच्या तहसीलदार सारिका कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मंदिर व परिसराची तसेच गावाची पाहणी केली आहे, तसेच काही सूचना सुद्धा यावेळी त्यांनी मंदिर समितीला, ग्रामपंचायत कार्यालयाला व प्रशासनाला दिल्या आहेत,

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी संपूर्ण मंदिर परिसराचा स्वतः पाहणी करून योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, यावेळी जाळीचादेव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ .अक्षय शिंदे .भोकरदनच्या तहसीलदार सारिका कदम व पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहेत.

या वेळी भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड ,पारध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, जाळीचादेव गावचे नवनिर्वाचित सरपंच समाधान उदरभरे, उपसरपंच सुधाकर उदरभरे, ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी गजानन ऊंबरकर, राहुल करंजकर , तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी ग्रामपंचायतचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. अशी माहीती सरपंच समाधान उदरभरे व उपसरपंच सुधाकर उदरभरे यांनी माहीती दिली. 
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













