कँन्सर ग्रस्त रूग्णांस श्री गणपती बँके कडून दहा हजाराची मदत चेअरमन राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मा. श्री. राजाभाऊ देशमुख मित्रमंडळ व श्री गणपती परिवारा कडून महिन्याच्या पहिल्या शनिवारी मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर लायन्स क्लब तर्फे घेण्यात येते, याच प्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच गरीब व गरजवंत रुग्णांना साठी श्री गणपती नागरिक सह पत संस्था मार्फत आर्थिक मदत केली जाते .
याचाच भाग म्हणून आज भोकरदन येथील मासणपुर रोड वरील काँन्सर ग्रस्त रुग्ण विठ्ठल गंगाराम गोरे यांना श्री गणपती बँकेचे चेरमन राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते १०,०००/ रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी चेअरमन श्री. राजाभाऊ देशमुख, शाखा व्यवस्थापक अंकुश सुरासे,संतोष अन्नदाते,योगेश गोरे, हरी गोरे, संभाजी तळेकर यांची उपस्थिती होती.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













