नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेडमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात खेड:शहरासह ग्रामीण भागात दोन वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी प्रथमच ४५० हून अधिक दहीहंड्या मोठ्या उत्साहात फोडण्यात आल्या. – आजचा महाराष्ट्र

खेडमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात खेड:शहरासह ग्रामीण भागात दोन वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी प्रथमच ४५० हून अधिक दहीहंड्या मोठ्या उत्साहात फोडण्यात आल्या.

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड):-गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडी सण साजरा केला गेला नव्हता आता सर्वच गोविंदा पथक पूर्ण जोशात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामधे खेड शहरातील चार प्रमुख दहीहंड्यांसह १०० पेक्षा जास्त व भरणेतील ४० हंड्यांचा

समावेश आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात आमदार योगेश कदम पुरस्कृत खेड तालुका शिवसेना आयोजित १ लाख ५१ हजार रुपयांच्या दहीहंडीचे बक्षीस खेमनाथ गोविंदा पथक सुसेरी- खारी,श्रीकृष्ण गोविंदा पथक

कुवारसाई व हिंदुराज मित्रमंडळ खेड या तीन गोविंदा पथकांना विभागून सामाईक बक्षीस देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित १ लाख ११ हजार बक्षीस असलेली दहीहंडी फोडण्याचा मान खेमनाथ गोविंदा पथक सुसेरी- खारी यांनी मिळवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारलेली ५१ हजार रुपयांचे बक्षीस असलेली हंडी श्रीकृष्ण गोविंदा पथक, कुवारसाई यांनी फोडली. शहर भाजपातर्फे कार्यालयासमोर २५ हजार रूपयांच्या बक्षिसाची दहीहंडी श्रीकृष्ण गोविंदा पथक, कुवारसाई यांनी फोडली.शहरात उभारलेल्या मोठ्या रक्कमेच्या दहीहंड्यांना तालुक्यातील १६ गोविंदा पथकानी सलामी देऊन हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. हिंदुराज मित्रमंडळ, हिंदुराज महिला मित्रमंडळ, श्रीकृष्ण गोविंदा पथक कुवारसाई, संत गोरा कुंभार मित्रमंडळ, हनुमान मित्रमंडळ खेड, एकविरा गोविंदा पथक,कुंभारवाडा, बालगोपाळ मित्रमंडळ, संत रोहिदास नगर मित्रमंडळ- शिवतररोड, श्री महालक्ष्मी गोविंदा पथक चाकाळे, श्री काळकाई गोविंदा पथक भरणे, श्री खोंडेकरीन देवी खोंडे, क्षेत्रपाल नगर गोविंदा पथक, जय हनुमान मित्रमंडळ- रेवेचीवाडी, खेमनाथ

गोविंदा पथक सुसेरी- खारी, भैरवनाथ गोविंदा पथक चिंचघर,श्रीकृष्ण गोविंदा पथक भडगाव आदी गोविंदा पथकांच्या गोविंदांनी मानाच्या हंड्या फोडण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी खेड पोलिसांच्या मार्फत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]