नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सवेणी नं.१ ता खेड शाळेत अभूतपूर्व झेंडा अनावरण करण्याचा निर्णय सवेणी शाळा प्रशासनाने घेतला – आजचा महाराष्ट्र

सवेणी नं.१ ता खेड शाळेत अभूतपूर्व झेंडा अनावरण करण्याचा निर्णय सवेणी शाळा प्रशासनाने घेतला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)-सवेणी गावात इयत्ता १० वीत ८९% गुण मिळवून प्रथम येणाऱ्या रिया रमेश गुजर या विद्यार्थिनीच्या हस्ते केले जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सवेणी नं.१ शाळेचे अमृत महोत्सवी झेंड्याचे अनावरण.असा उपक्रम करणारी ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.त्यामुळे खेड पंचायत समिती (शिक्षण) चे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.शिगवण साहेब,विस्तार अधिकारी सौ स्मिता साळुंखे, केंद्रप्रमुख श्री.सदाशिव राठोड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषद शाळा सवेणी नं.१ शाळेतील शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.युवराज गुजर,उपाध्यक्षा सौ. आदिती जाधव,सदस्य श्री.अनिल कदम,सौ.अश्विनी गुजर,सर्व ग्रामस्थ आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.गोपाळ जाधव सर,उपशिक्षक श्री अनंत चव्हाण सर,पदवीधर शिक्षक श्री कृष्णा गंभीरे सर,श्री.एकनाथ पाटील सर आणि उपशिक्षक श्री.प्रशांत गायकवाड सर यांच्या कल्पनेतून केला गेला नवा क्रांतिकारक निर्णय. हेदली सवेणी गावातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 15 ऑगस्टचा झेंडा फडकविण्याचा मान दिला जाणार आहे. आता दरवर्षी हा मान कोण मिळवणार यासाठी सवेणी गावातील मुलांमध्ये नक्कीच चुरस निर्माण होणार आहे.त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात नवी क्रांती नक्कीच निर्माण होणार आहे.

या कार्यक्रमात बोलताना सरपंच सौ. मिना सावरटकर आणि उपसरपंच श्री.राजेंद्र गुजर यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्वांचे कौतुक केले.या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार माजी सरपंच श्री. मुक्तारभाई कावलेकर,श्री.उमेश देवरुखकर,श्री.विकास विचारे, ग्रा.प.सदस्या सौ.अमृता सागवेकर,सौ. सुवर्णा महाडिक,सौ.दिपाली शिंदे हे होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]