नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शाळा की बियाणे…? “पुढच्या पिढीसाठी जपायची सरकारी शाळा” – आजचा महाराष्ट्र

शाळा की बियाणे…? “पुढच्या पिढीसाठी जपायची सरकारी शाळा”

संकलन मणिलाल शिंपी

ठाणे :- शाळा या विषयावरील माझा हा तिसरा लेख आहे. यां लेखात मी शालिकी बियाणे हे . शीर्षक मी मुद्दामून दिले मी गावाखेड्यातला एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे आजच्या सीबीएससी आयसीएसी इंग्रजी माध्यम या शाळांप्रमाणे आपल्या सरकारी शाळा का बनवल्या जात नाही या विषयावर मनात एक प्रश्न मात्र मनात निर्माण केला.सरकारी शाळा नेमक्या कोणासाठी आहेत आणि त्या टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्यासाठी मी एक उत्तम दाखला भूतकाळातला आपणास देऊ इच्छितो १९७२ चा भीषण दुष्काळ देशाने अनुभवला. अन्नाची प्रचंड टंचाई होती. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. पण शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेले बियाणे खाल्ले नाही. कारण त्यांना माहीत होते “आज हे बियाणे खाल्ले, तर उद्या पेरणी कशाने करायची..? आणि उद्याची शेतीच झाली नाही, तर पुढच्या पिढीने जगायचे कसे?”मला वाटते, सरकारी शाळा म्हणजे आपल्या समाजासाठी जपून ठेवलेले तेच बियाणे आहे…..!
आज अनेक सरकारी शाळांची अवस्था चिंताजनक आहे. इमारती जीर्ण होत आहेत, आवश्यक सुविधा अपुऱ्या आहेत,विद्यार्थीसंख्या कमी होत आहे आणि त्यातून हळूहळू सरकारी शाळा बंद होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.पण आपण हे केवळ एका शाळेचे किंवा एका गावाचे दुर्दैव म्हणून पाहणार आहोत का.?
नाही ना ! कारण सरकारी शाळा ही केवळ एक इमारत नाही. ती गरीबाच्या मुलासाठी शिक्षणाची आशा आहे. ती ग्रामीण , वंचित आणि उपेक्षित समाजातील मुलांसाठी संधीचे दार आहे. ती सामाजिक समतेची प्रयोगशाळा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती पुढच्या पिढीच्या भविष्याची पेरणी करणारी जागा आहे.
म्हणूनच सरकारी शाळा वाचवणे म्हणजे केवळ शाळेची इमारत वाचवणे नव्हे;तर आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य वाचवणे होय.सरकारी शाळांमध्ये उत्तम इमारती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, प्रयोगशाळा, संगणक, ग्रंथालय, क्रीडासुविधा, डिजिटल साधने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या सर्वांची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारलीच पाहिजे.लोकशाहीमध्ये सरकार जनतेसाठी असते. त्यामुळे सरकारने केवळ तात्पुरत्या लोकप्रिय योजना राबवून मतपेट्या भरण्यापेक्षा शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर दीर्घकालीन काम करणे आवश्यक आहे.आणि आपण नागरिकांनीही केवळ सरकारकडे बोट दाखवून थांबता कामा नये.ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या शाळेत आपल्या गावातील मुले शिकतात, त्या शाळेची अवस्था काय आहे? शिक्षक पुरेसे आहेत का? सुविधा आहेत का? शिक्षणाचा दर्जा चांगला आहे का?हे प्रश्न विचारणे म्हणजे राजकारण नव्हे.हे जागरूक नागरिकत्व आहे.गावातील ग्रामस्थांनी, पालकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आपल्या गावातील शाळेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सरकारकडे मागणी केली पाहिजे, निधी मागितला पाहिजे, सुविधा मागितल्या पाहिजेत आणि आवश्यक असेल तर सरकारला जाबही विचारला पाहिजे.कारण आज आपण गप्प बसलो, तर उद्या आपल्या मुलांच्या हातात प्रश्न असेल“आमच्यासाठी असलेली सरकारी शाळा तुम्ही का वाचवली नाही?”त्या वेळी आपल्याकडे उत्तर नसेल.म्हणून आजच ठरवूया सरकारी शाळा मोडकळीस येऊ देणार नाही.शाळा बंद पडू देणार नाही.शिक्षणाची गुणवत्ता कमी होऊ देणार नाही.आणि पुढच्या पिढीच्या भविष्याशी तडजोड करणार नाही.
१९७२ मध्ये शेतकऱ्यांनी उद्याच्या पिकासाठी बियाणे जपले होते.आज आपण उद्याच्या भारतासाठी सरकारी शाळा जपायच्या आहेत.कारण बियाणे वाचले तर शेती वाचते आणि शाळा वाचल्या तर पिढ्या घडतात. आज सरकारी शाळा वाचवूया उद्याचा भारत घडवूया सेवानिवृत प्राचार्य श्री.विकास मुकुंदराव पाटील

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]