नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी संपादक डॉ.किशोर पाटील यांची निवड! – आजचा महाराष्ट्र

इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी संपादक डॉ.किशोर पाटील यांची निवड!

प्रतिनिधी

मुंबई :- भारतीय चित्रपट, कला, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक,ज्येष्ठ पत्रकार व विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी दै. स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.मुंबईस्थित भारतीय सिनेयुग प्रॉडक्शन अँड अकॅडमी (Bhartiya Cineyug Production and Academy) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे पर्व (सीझन-३) आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे कर्तृत्ववान व्यक्ती, विक्रमवीर आणि समाजहितासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.आयोजक संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नामांकन पत्रानुसार, डॉ. किशोर बळीराम पाटील यांची पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई येथील अंधेरी पश्चिम, जुहू लेन परिसरातील मेयर्स ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजक अनिल शिंपी यांनी दै.स्वराज्य तोरणशी बोलतांना दिली.डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या ‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कार निवडीबद्दल पत्रकार, साहित्यिक, सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, कार्यकर्ते तसेच त्यांच्या शुभेच्छुकांनी समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]