नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न! – आजचा महाराष्ट्र

३६ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न!

प्रतिनिधी

मुंबई (ठाणे) :- ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत शहर वाहतूक शाखा, ठाणे उपविभाग, भिवंडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ३६वे रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीपणे संपन्न झाले. या अभियानाच्या अनुषंगाने मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये वाहनचालक, नागरिक तसेच कर्मचारी वर्गाची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे आरोग्य आणि सुरक्षित वाहन चालकांना यामधील महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाट, सहायक पोलीस आयुक्त श्री. शरद ओव्हाळ साहेब यांचा निर्देशानुसार तसेच वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर खरात, यांचा प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियान विभागीय नोडल ऑफिसर(आर एस पी ) डॉ.मनिलाल शिंपी यांनी वाहतूक नियमांबद्दल रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करताना पी आर विद्यालयाचे आर एस पी चे बालसैनिंकांना रस्ते वाहतूक नियम आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण समाजामध्ये वाहतूक दूत म्हणून कर्तव्य करायचे आहे. तसेच प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत RSP पथक तयार करणे आवश्यक आहे असे सांगितले.यावेळी भैरव चॅरिटेबल ट्रस्ट चा सहकार्याने RSP बालसैनिकांना RSP चा गणवेश कापड मोफत वाटप करण्यात आले.नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.सदर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन श्री भैरव चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करण्यात आले. आयोजकांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.रस्ता सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.यावेळी शहापूर भिवंडी तालुका समन्वय अधिकारी श्री.मंगेश भामरे,पी आर विद्यालयाचे आर एस पी अधिकारी श्री.निलेश नरवडे,सदाशिव गारळे,तसेच आर एस पी महिला अधिकारी ,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांच्यासह पत्रकार बंधूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वितेसाठी पोलिस हवालदार सचिन वेताळ, सुर्यकांत भोसले, योगेश महाले, अमोल कांबळे, पद्माकर गोंधळी यांच्यासह सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.सदाशिव गारळे यांनी केले.आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.निलेश नरवडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]