नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरबाडमध्ये ब्रह्माकुमारींज द्वारा नशा मुक्त भारत अभियान जनजागृती – आजचा महाराष्ट्र

मुरबाडमध्ये ब्रह्माकुमारींज द्वारा नशा मुक्त भारत अभियान जनजागृती

प्रतिनिधी

व्यसन दुष्परिणामांवर पथनाट्याद्वारे प्रभावी संदेश

ठाणे (मुरबाड) :- गौरी-गणपती उत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात आली. शहर व परिसरातील गावे तसेच शाळांमध्ये व्यसनमुक्ती आणि मोबाईलच्या दुष्परिणामांविषयी पथनाट्य सादरीकरणातून प्रभावी संदेश पोहोचविण्यात आला.या मोहिमेत मुंबईतील विविध शाखांतील ब्रह्माकुमारीज् चे सदस्य सहभागी झाले. ब्रह्माकुमार देवेंद्र भाई यांच्या नेतृत्वाखालील पथनाट्य पथकाने पावसाची पर्वा न करता निस्वार्थ भावनेने सलग तीन-चार दिवस २५ ठिकाणी कार्यक्रम सादर केले. मुरबाड शाखेतील वैशाली दीदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.समाजहितासाठी पथनाट्याचा वापर पथनाट्य हे जनतेपर्यंत थेट संदेश पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे. मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प केला पाहिजे.” –असां संदेश ब्रह्माकुमारी राणी दीदी यांनी दिला शाळांमधील जनजागृती न्यू इंग्लिश स्कूल, हेरिटेज इंग्लिश मीडियम स्कूल, निर्मला तोंडलीकर विद्यालय यांसह अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लहान मुलांमध्ये मोबाईलच्या अतिरेकामुळे होणारे शारीरिक, मानसिक व शैक्षणिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.ध्यानसाधना मेडिटेशन अनुभूति व व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा कार्यक्रमाचा समारोप सामूहिक ध्यानसाधनेने करण्यात आला. सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्त राहून स्वच्छ, निरोगी व आदर्श समाज घडविण्याची प्रतिज्ञा घेतली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]