कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक कै. श्री. सुरेशभाई दगडूजी कदम याचं आकस्मिक निधन
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- जो आवडतो सर्वांला तोची आवड देवाला या उक्तीप्रमाणे आज ,कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक कै. श्री. सुरेशभाई दगडूजी कदम यांच्या उत्तरकार्य विधी यानिमित्त कदम कुटुंबियांबद्दल बोलायचं झालं तर दगडूजी कदम आणि केशव आबा दोघे बंधू. या दोन बंधू यापैकी दगडूजी कदम यांना तीन मुलगे व पाच मुली तर केशव आबा यांना 3 मुलगे व दोन मुली असा मोठा परिवार. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा व समाज कार्यात पुढाकार घेणारा. दगडूजी कदम यांना तीन मुलगे सुरेशभाई, रमेशराव आणि राजूशेठ आणि पाच मुली या परिवारातील दगडूजीराव यांच्या संस्कारात वाढलेली ही सर्व संस्कार संपन्न मुलं आजही आपल्या वडिलांचा वारसा पुढे जपताना दिसतात. समाजात त्यांची सर्वांच्या सुखदुःखामध्ये धाऊन जाण्याची वृती नेहमीच दिसून येते. विशेषत: राजूशेठ यांच्या सारखा समाजसेवा वृत्ती जपणारा समवेत व्यवसाय आणि राजकारण यातही सक्रिय असणारा मुलगा. पंचायत समिती सदस्य, तालुका सभापती, ठाणे महानगर पालिका नगरसेवक असा
राजकीय वारसाही या कुटुंबात लाभला. राजुशेठ याच्या वागण्यातून दगडूजी कदमांचे समाजसेवी संस्कार आपल्याला दिसून येतात यापैकी सुरेशभाई हे थोरले. सुरेशभाईचा जन्म ९ जून १९६१ चा. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा नवानगर यानंतर नूतन इंग्लिश स्कूलची तिसंगी या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी खेड येथील एल.पी. इंग्लिश स्कूल खेड येथे बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर काही करण्याची जिद्द त्यांच्या मनात असल्यामुळे व शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी शिक्षणाचा वसा पुढे चालू ठेवत मुंबई मधील नामांकित सिद्धार्थ कॉलेजमधून बी.कॉम. व एम.कॉम. चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणात अतिशय हुशार आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अथक प्रयत्नाने ०१ मार्च १९८७ रोजी वयाच्या २५ वय वर्षी आपलं शिक्षण पूर्ण करून पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल म्हणून मरोळ अंधेरी (मुंबई पोलीस) येथे भरती झाले. त्यानंतर नोकरीतील मुलुंड, एअरपोर्ट, लॅमिंटन रोड अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आपली प्रामाणिक सेवा बजावली. शिपाई म्हणून भरती झाल्यानंतरही अभ्यासाचा व्यासंग कायम ठेवत त्यांनी थेट एम.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षेतून यशस्वी कामगिरी करत डायरेक्ट पी.एस.आय. म्हणून १९९८ मध्ये त्यांना नियुक्ती मिळवली. शेवटी ते कुलाबा या पोलीस स्टेशन येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.आपल्या ३२ वर्ष सेवेच्या काळामध्ये २६/११ च्या CSMT, ताज हॉटेल बॉम्बस्फोट हल्ल्यांमध्ये देखील अतिरिक्त संरक्षण फोर्स मधून एका युनिटचे संपूर्ण नेतृत्व आणि जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती ती त्यांनी कर्तव्यदक्षतेने पार पडल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करून देखील गौरवण्यात आले. ११ जुलै २००६ रोजी महालक्ष्मी येथे झालेल्या बॉम्बस्फोटच्या वेळी तेथील संबंधित पोलीस स्टेशनचा कार्यभार त्यांच्याकडे होता या वेळेला चोख कामगिरी बजावत बॉम्बस्फोटची परिस्थिती अतिशय कर्तव्यदक्षतेने हाताळत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पोलीस खात्याअंतर्गत विशेष पदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या या विशेष कामगिरीची दाखल टाइम्स ऑफ इंडिया या अग्रनामांकित वृत्तपत्राने देखील घेतली होती.गणेशोत्सव काळात गिरगाव चौपाटी येथील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाची जबाबदारी त्यांनी अशा प्रकारे कर्तव्य दक्षतेने हाताळली होती की त्यामुळे तेथील पोलीस स्टेशनमधून दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्यावरही त्यांना विसर्जन काळात विशेष जबाबदारी दिली जाईल आणि सुरेशभाई ही जबाबदारी देखील वरिष्ठांच्या विश्वासाला पात्र राहून अतिशय कर्तव्य दक्षतेने निभावत असत. महाराष्ट्रातील विविध केसमध्ये त्यांनी गुप्त पद्धतीने तपासणी केलीच याचबरोबर मध्य प्रदेश, मनाली येथील संयुक्त केस मध्ये देखील त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली होती जी त्यांनी आपल्या अभ्यासूवृत्तीने चणाक्षपणे पार करून त्याबद्दलही त्यांना वरिष्ठांकडून, खात्याकडून वाहवा मिळवली होती.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













