नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तळा तालुका गवळी समाज क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

तळा तालुका गवळी समाज क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी संजय रिकामे

प्रथम पारितोषिकाचे मानकरी आर.के.संघ बोरीचामाळ तर द्वितीय विजेते आर सी सी संघ गौळवाडी

रायगड (तळा) :- भाईंदर येथे तळा तालुका गवळी समाजातर्फे ओअरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन ट्रस्टचे स्थानिक अध्यक्ष खेळू वाजे यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आर.के.संघ बोरीचामाळ वीस हजार रूपये, द्वितीय क्रमांक आर सी सी संघ गौळवाडी दहा हजार व आदर्श संघ सोमजाई क्रिकेट संघ दहिवली यांनी पटकावला तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज विशाल रिकामे, उत्कृष्ट फलंदाज सागर महागावकर, मालिकावीर मोहन गायकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.भाईंदर येथे भरविण्यात आलेले हे क्रिकेट सामने पाहण्यासाठी क्रिकेट रसिक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अंतिम सामना पाहण्यासाठी तळेवासीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तळा तालुका गवळी समाजाने सर्वांना समान संधी देउन उत्तम क्रिकेट पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध करुन दिली भविष्यात रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी तळा तालुक्यातील खेळाडुंना मिळावी अशी अपेक्षा येथील मान्यवरांनी केली या पारितोषक वितरण सोहळ्यात ज्यांनी देणगी स्वरूपात मदत केली त्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे तळा तालुका गवळी समाज क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेले प्रत्येक संघाला शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम पारितोषिकाचे मानकरी आर.के.संघ बोरीचामाळ, तर द्वितीय विजेते आर सी सी संघ गौळवाडी यांस मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व ट्राॅफी देउन गौरविण्यात आले अंतिम सामन्याचा सामनावीर मोहन गायकर ठरला. कार्यक्रमाच्या समारोपामध्ये गवळी समाज तसेच सर्व क्रिकेट संघ यांनी केलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त करुन भविष्यात तळा तालुक्यात समाजाने एकत्रित येऊन समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी एकसंघ राहावे असे आवाहन करण्यात आले तळा तालुका गवळी समाज क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानुन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]