नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कल्याण येथे आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. – आजचा महाराष्ट्र

कल्याण येथे आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मानिलाल शिंपी

खेळाडूंमध्ये उत्साह आणि जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संचालकांना आवश्यक ते सहकार्य राहील:संस्थापक अध्यक्ष प्रकाश मुथा.

ठाणे(कल्याण) :- आ. मा . टॉ.टे.न्यू दि. २८ जुलै २०२६ : सेठ हिराचंद मुथा महाविद्यालय, कल्याण (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला विविध शहरांतील संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली तसेच मुंबई परिसरातील संघांनी सहभाग नोंदविला.याआंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनुजा ब्रह्म , IQAC समन्वयक अजय पिल्ले , तसेच क्रीडा समितीचे सदस्य सुनील सूर्यराव,जगन मिरकुटे , दीपिका प्रसाद,

वैशाली तेजे मॅडम, निवेदिता शेवाळे, विनायक गावंडे,आचल घोडके,नम्रता मॅडम, क्रीडा विभागप्रमुख दिनेश थळे उपस्थित होते.अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात बी. के. बिर्ला स्कूल, कल्याण संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. तर होली इंजल्स स्कूल, डोंबिवली संघाने उपविजेतेपद मिळविले.तसेच जुनिअर कॉलेज अंतिम सामन्यात मॉडेल कॉलेज डोंबिवली east संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. तर C H M कॉलेज उपविजेतेपद मिळविले.(UG to PG) कॅटेगरी मधे मॉडेल कॉलेज डोंबिवली east संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. तर C H M कॉलेज ने उपविजेतेपद मिळविले विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि शिस्त जोपासण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात, तसेच प्रशासकीय सेवा,स्पर्धापरीक्षा कडे वळणाऱ्या विद्यार्थांनी खेळ स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे असे मत यावेळी  संस्था अध्यक्षांकडून व्यक्त करण्यात आले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी क्रीडा समितीचे कौतुक केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]