रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी अडकली लोकसभा उमेदवारीच्या विळख्यात

रायगड :- लोकसभेच्या निवडणुकीची चाहूल लागताच व लागण्या अगोदरच आपले संघटन व पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुखांनी व त्यांचे असलेले नेते यांनी देशात वेगवेगळे पक्षांची राजकीय समीकरणे तयार केली आणि नव्याने करीत आहेत हे सर्व पाहून मतदार राजा आधीच पूर्णतः भ्रमिष्ट झालेला दिसत आहे ते कमी पडते की काय तोच राजकीय पक्ष यांच्यातच जागा वाटप वरून तणाव निर्माण होताना दिसत आहे यात रायगड जिल्हा ही चुकलेला नाहीये महाराष्ट्रात सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अचानक बदललेली आपली राजकीय कूस यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेपासून मंत्रिमंडळाच्या विस्तारांपासून दूर राहावे लागले याचे दुःख सतत वरिष्ठांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांवर दिसत होते त्यातूनच राजकीय वेगवेगळी समीकरणे निर्माण होऊ लागली होती त्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा नारा देऊन संघटनात्मक कार्यकर्त्यांना बळ दिले त्याची सुरुवात झाली ती विरोधी पक्षातील मातब्बर व 
पराजित नेत्यांना पक्षात प्रवेश करून येणाऱ्या निवडणुका सर्व ताकतीने लढायच आणि जिंकायच्या त्याचाच भाग म्हणून स्वतःचा घरचा असलेला पक्ष सोडून अनेक दिग्गज नेते पक्ष प्रवेश करू लागले त्यात रायगड जिल्ह्यातील पेन चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा ही पक्षप्रवेश करून त्यांना संभाव्य लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड प्रमुख हे पद देण्यात आले त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच भारतीय जनता पक्षाला तरुण निस्वार्थी व तळागाळातला भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नसलेला गोरगरिबांचा कैवारी सामाजिक व राजकीय दांडगा अभ्यास असलेला अशा प्रकारचा उमेदवार धैर्यशील पाटलांच्या नावाने निश्चित झालेला असल्यामुळे दक्षिण रायगड कार्यकर्त्यांमध्ये विजय जोश निर्माण झाला व सर्वत्र दक्षिण रायगड जिल्हा हा भारतीय जनता पक्ष होण्याच्या वाटचालीला सुरुवात झाली गेली दहा वर्ष सन्माननीय नामदार रविंद्रजी चव्हाण साहेब ,पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी केलेल्या जनसंपर्क व संघटन बांधणीच्या जोरावर जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झालेच होते त्याचीच पोचपावती पेनमध्येही वरिष्ठ राजकीय दांडगा अनुभव असलेले मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले सन्माननीय रवीशेठ पाटील हेही पेनचे आजी आमदार विजयी होऊन दक्षिण रायगडमध्ये एक कमळ उमळले गेले तीन वर्षे विधिमंडळात विरोधी बाकावर असतानाच महाराष्ट्र विधिमंडळात पुन्हा एकदा भाजपाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या अथक प्रयत्नाने शिवसेनेच्या असंतुष्ट सहकाऱ्यांच्या सहकार्याने विधिमंडळात सत्ता स्थापनेत यश आले त्यामुळे रायगडची उमेदवारी सन्माननीय धैर्यशील पाटलांना अधिकच बळ उमेदवारीसाठी प्राप्त झाले जवळजवळ निवडणुकीची औपचारिकता आणि विजयाचा शंख नादच करायचा शिल्लक राहिलेला होता परंतु पाहता पाहता काळाने घात केला आणि फुटीर राष्ट्रवादी मंत्रिमंडळात सामील झाली आणि धैर्यशील पाटलांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून जातो की राहतो अशी अवस्था निर्माण झाली जसे जसे दिवस पुढे गेले तशा तशा लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि मित्र पक्ष म्हणून निवडणुका एकत्र लढवणे आणि जागा वाटपाचे प्रश्नचिन्ह समोर आले त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच मोदी समर्थक जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले ज्या केंद्रातील विकासावर निवडणुका लढवणे सोपे होते परंतु काही मित्रपक्ष सोबत आल्यामुळे अवघड जागेचे दुखणे झाले त्यातच रायगड लोकसभा ही सेटिंग लोकसभा असल्यामुळे प्रश्न आणखीनच अवघड होऊन बसला आता सन्माननीय वरिष्ठांनी सन्माननीय धैर्यशील पाटलांना दिलेला शब्द पाळतात की नाही हे रायगडची जनता आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व मोदी समर्थक जनता पाहत असल्याचे चित्र दिसत आहे याची चर्चा रस्तो रस्ते गावोगावी हॉटेल चहाच्या टपऱ्या सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी लोकांकडून ऐकावयास मिळत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













