रोहा नगर पालिका प्रशासनाची कर वसुलीची आघाडी

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील रोहा नगर पालिका नेहमीच राजकीय, सामजिक, व्यावसायिक तसेच प्रदूषणाने नेहमी चर्चेत असणारी नगर पालिका कुंडलिक नदी लगत असलेली नगरीला पाण्याचा उत्कृष्ट साठा लगत असलेले रेल्वे स्टेशन , लागूनच असलेले एम आय डी सी असे रोहा शहरचे वैभव अनेक गावांची मुख्य बाजारपेठ त्यामुळे रोहा नगरीचे महत्व फारच वाढत गेले त्यामुळे शहराच्या होणाऱ्या विकासा बरोबरच प्रदूषणनानेही शहराला 
विळखा घातला त्याचाच फायदा राजकीय सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासाच्या नावाखाली अनेक योजना कागदोपत्री राबवणे सुरुवात केली त्यातच नगरपालिका मध्ये एक हाती सत्ता विरोधकांचे नामो निशान नसल्यामुळे त्यांना जागा मोकली झाली शहराच्या महत्त्वाच्या विकास कामांन कडे दुर्लक्ष करून कुंडलिका नदी संवर्धन नावाने अनेक निधी खर्च करून विकासाची गंगा असा गाजा बाजा करण्यात येऊन नदी लगत असलेल्या पात्रावर भराव करून उद्यान बनून काही मोकळी जागा ठेवण्यात आली त्याचा उपयोग राजकीय पक्षांचे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम घेण्यात येऊ लागले या सर्व कामान मुळे लोकांमधे नाराजी होती लोकांना स्थानिकांनी त्या बागेत फिरण्यास मज्जाव करण्यात येत होता परंतु राजकीय कार्यक्रम करण्यास मुक्त मुभा असा काहीचा त्या उद्यानाचा उपयोग होउ लागला आता तर नगर पालिका शासन बरकास्त होऊन काही महिने झाले जनतेशी निगडित असलेली महत्त्वाची कामे शिल्लक राहिली गेली निवडणूका वेळेत न घेतल्या मुळे प्रशासकीय कारभार चालू आहे त्याचाच फायदा प्रशासनाने उचलला की त्या मागील अदृश्य शक्तीने उचलत आहे याचे कोडे जनतेला पडले आहे नदी संवर्धनातील उद्यानालगत फिरण्यास चालण्यास येणाऱ्या नागरिकांना आता १५० ते ३०० रु पर्यंत मासिक शुल्क आकारण्याचा प्रशासनाने ब्यानरच लावलेले जागो जागी दिसत आहेत हे कोणत्या राजकीय पक्षांच्या अदृश्य शक्तीच्या सहकार्याने होत आहे याची चर्चा शहरात आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही अशा प्रकारचे नियोजन करण्यास मनाई असताना हा पडद्यामागे कारभार कोण हाकत आहे याचे जनतेत चर्चा आहे काही ठिकाणी तर हे सर्व निवड नुकीची सुवात आहे असे बोलेल जात आहे प्रशाकीय अधिकाऱ्याकडून असे चुकीचे काम करून घेऊन जनतेमध्ये असंतोष पसरवायचा नंतर त्यांचे मुद्दे बनुन याचा फायदा घेत आम्ही ते कमी करू चर्चा करत आहोत असे जनतेत भासवण्याचे हे प्रतिनिधि करत तर नाहीत अशी नाक्या नाक्या वर चर्चा आहे तरी नागरीकांना यांच्या अशा दावेपेचाचा बळी न पडत विकासाचा धर्तीवर काम करणे एकत्र येणे गरजेच आहे असे बोलले जात आहे. तशेच कर आकारनीच्या बाबींचा निषेध करताना दिसत आहे यातून प्रशासन काही बोध घेऊन जनतेची होणारी पिळवणूक थाभेल का याच्या प्रतिक्षेत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













