नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला – आजचा महाराष्ट्र

रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला

प्रतिनिधि मतीन करदमे

शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

रायगड (श्रीवर्धन) :- अनेक वर्ष पासून माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते ते रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्ग मधे गेली ते आजही आपले भरपाईची वाट पाहत आहेत. असाच एक प्रकार म्हसळा येथे ज्येष्ठ नागरिक शरीफ हळदे यांचे सोबत घडला आहे. गरीब शेतकरी ची जागा मौजे सकलप स.नं १९/१ ही भूसंपादन करण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता व जागा मालकाला कोणताही मोबदला न देता माणगाव ते दिघे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण

करण्यात आले. आज ही ते मोबदल्याची वाट पाहत आहेत. वेळो वेळी त्यांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली गेली अखेर त्यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. दिनांक ०५ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकारी श्रीम. दीपा भोसले यांना लेखी अर्ज देऊन १५ दिवसात जर मोबदला मिळाला नाही तर मी उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन यांच्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे आणि या अर्जाची परत राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे, मा.श्री नितीनी गडकरी, मा. ना कु.अदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्रराज्य, मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी रायगड, मा. पोलीस अधीक्षक रायगड, मा. तहसीलदार म्हसळा यांच्या माहिती साठी व पुढील कारवाई साठी पाठवण्यात आलेली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]