नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संविधान जागर व प्रस्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

संविधान जागर व प्रस्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधि आलिबाग 

रायगड दि.28 :- संविधान दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड, अलिबाग कार्यालयामार्फत (दि.२६ नोव्हेंबर २०२३) रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ संविधान जागर व प्रस्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,रायगड सुनिल जाधव यांनी दिली आहे.यावेळी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, रायगड-अलिबाग या कार्यालयातील कर्मचारी कार्यालय अधिक्षक श्रीमती माधुरी पाटील, समाज कल्याण

निरीक्षक अंकुश पोळ, कनिष्ठ लिपीक श्रेयश खरोटे, नियमित व बाहयस्त्रोत कर्मचारी तसेच मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अलिबाग व मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलीचे शासकीय वसतिगृह अलिबाग या दोन्ही वसतिगृहातील गृहपाल श्री एस.एफ. कदम व श्रीमती यु.एस. गुजेला उपस्थित होते.सर्वप्रथम सदर कार्यालयाचे कर्मचारी श्रीमती माधुरी पाटील, अंकुश पोळ तसेच वसतिगृह गृहपाल एस.एस.कदम व श्रीम यु.एस. गुजेला यांनी एकत्रित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केले. तसेच सर्व अधिकारी/कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनींनी प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन केले. तसेच वरील सर्व कर्मचारी व विद्यार्थी संविधान जागर यात्रेमध्ये मोठया उत्साहाने सहभाग घेतला. या संविधान जागर यात्रेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळून सुरु होवून सांगता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड कार्यालयाजवळ करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]