नेपाळमध्ये अडकलेल्या रायगडच्या पर्यटकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राकडून आवाहन; पर्यटकांची माहिती संकलित करण्यास सुरुवात
रायगड (आलिबाग ) – (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित केली जात आहे. ज्या पर्यटकांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नेपाळमध्ये सध्या असलेले रायगड जिल्ह्यातील पर्यटक अथवा त्यांचे नातेवाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा. यासाठी ८२७५१५२३६३, तसेच ०२१४१-२२२११८ आणि ०२१४१-२२२०९७ या क्रमांकांवर माहिती देता येणार आहे.प्रशासनाला माहिती देताना संबंधित
पर्यटकाचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचे नाव, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो देणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच आवश्यक त्या मदतीसाठी प्रशासनाला समन्वय साधणे शक्य होणार आहे.रसुवा
जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी अफवा किंवा अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.आपत्तीग्रस्त भागातील रायगडच्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक माहिती मिळविणे, संबंधित यंत्रणांशी संपर्क साधणे आणि गरजेनुसार समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













