नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आ.सत्यजीत तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळीच्या राज्यभर विस्तारास रायगडमध्ये उस्फुर्त प्रतिसाद! – आजचा महाराष्ट्र

आ.सत्यजीत तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळीच्या राज्यभर विस्तारास रायगडमध्ये उस्फुर्त प्रतिसाद!

प्रतिनिधि कोलाड 

रायगड (कोलाड) :- सुदृढ समाज निर्मितीचे ध्येय घेऊन जयहिंद लोकचळवळ अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. मागील काही दिवसांपासून जयहिंद लोकचळवळीने संघटनेच्या राज्यस्तरीय विस्तारास सुरुवात केली आहे. रायगड येथील जिल्हास्तरीय पहिली आढावा बैठक आंबेवाडी येथे पार पडली आहे. यावेळी माननीय आमदार सत्यजीतदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक हरिओम टाळकुटे रायगड जिल्ह्यात जयहिंद लोकचळवळ चा विस्तार करत आहे .जयहिंद मध्ये सामिल होण्यासाठी आधीच ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केलेल्या व काही नवीन तरुण युवक युवतींनी या मध्ये मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला.

यावेळी हरिओम टाळकुटे, कमलेश उनवणे(जयहिंद उद्योजकता विकास प्रकल्प प्रमुख), हर्षल थेटे (प्रमुख समन्वयक, जयहिंद लोकचळवळ) यांनी संघटनेची उद्दिष्टं, संघटनेतर्फे होणारे उपक्रम, त्या उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांकडून अपेक्षित सहभाग आदी गोष्टींबाबत उपस्थितांना ॲानलाईन मार्गदर्शन केले.येत्या पावसाळ्यात उजाड माळरानावर जयहिंद मार्फत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन अभियान करणार असल्याचे जिल्हा समन्वयक हरिओम टाळकुटे यांनी जाहीर केले . उजाड माळरानावर जयहिंद उद्यान निर्माण करुन निसर्गाची जोपासना करणार असल्याचे सांगितले.यावेळी मंगेश जाधव,विनायक कोळी,दिनेश जाधव,नितीन कोळी,अंकुश जाधव,सतीश जाधव,अर्जुन कापरे आदी सहकारी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]