नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माणगांव विभागात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे रणसंग्राम पत्रकार आदित्य रमेश गोरेगांवकरांचे मतदार जनतेला आव्हान – आजचा महाराष्ट्र

माणगांव विभागात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे रणसंग्राम पत्रकार आदित्य रमेश गोरेगांवकरांचे मतदार जनतेला आव्हान

प्रतिनिधी पांडुरंग माने 

रायगड (माणगाव) :- निवडणूक किंवा निर्वाचन, लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे जनता (लोक) आपल्या प्रतिनिधींना निवडते. निवडणूका द्वारे आधुनिक लोकतंत्रचे लोक आमदार(आणि कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका) या विभिन्न पदांवर निवडून येण्यासाठी व्यक्तिंना निवडतात. निवडणूकांद्वारे क्षेत्रीय आणि स्थानीय जागांसाठी या व्यक्तिंची निवड होते.वस्तुतः निवडणूकांचा प्रयोग व्यापक स्तरावर होत आहे आणि हे

खाजगी संस्था, क्लब, विश्वविद्यालय, धार्मिक संस्था, इत्यादी मध्ये पण प्रयुक्त होते. भारतीय लोकशाहीची निवडणूक प्रक्रियाभारतीय लोकतंत्रात निवडणूक प्रक्रियाचे वेगवेगळे स्तर आहे परंतु मुख्यत: संविधानात पूर्ण देशासाठी एक लोकसभा आणि वेगवेगळ्या राज्यांकरिता वेगळे विधानसभाचे प्रावधान आहे. लोकसभाच्या एकूण ५४३ जागांपैकी विभिन्न राज्यातील वेगवेगळ्या संख्या मध्ये प्रतिनिधि निवडले जातात. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा साठी ही वेगवेगळ्या संख्या मध्ये आमदार निवडले जातात.नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्कर मताधिकार प्राप्त मतदाता प्रत्यक्ष मतदानाद्वारे सांसद आणि आमदार निवडतात. लोकसभा आणि विधानसभा दोन्हीचा कार्यकाल पाच वर्ष असतो.सध्या परिस्थितीत माणगांव विभागात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे चालू झाले असल्याचे दिसून येते. त्यात नुकतेच बहुतांश पक्षांमध्ये झालेली ताटातूट आणि पडलेले गट-तट ज्यामुळे भाऊ-भाऊचा वैरी झाला असल्याचे चित्र सुद्धा दिसून येते. स्वतः च्या वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रभावात येऊन जनता अनुचित प्रकार करून नेहमीच भरडली गेली आहे.आता काय? तर ज्यांनी कधी ग्रामसभा पहिली नाही असे उमेदवार पण सरपंच पदासाठी दावा करताना पाहायला मिळतील. निवडून आल्यानंतर ज्यांनी पाच वर्षात कधी जनतेला महत्त्व दिला नाही व आपल्या शहराचा विकास होतो आहे कि नाही याचीही काळजी केली नाही असे उमेदवार सुद्धा आपल्या दारात येऊन त्यांच गार्‍हाणं गातील. परंतू तुम्ही सावध राहा असे आव्हान पत्रकार आदित्य रमेश गोरेगांवकर यांनी केले आहे. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, उगाच कोणासमोर लाचार होऊ नका, अल्पश्या किमती मध्ये स्वतः चे अमूल्य मत विकू नका.“येऊन येऊन येणार कोण? आमच्या शिवाय आहेच कोण?” अश्या घोषणा देत शहरात विकासकार्य घडवून आणू असे वचन करित बरेच चमचे तुमच्या दारात येतील परंतू पूर्ण पडताळणी केल्या शिवाय कोणाला एकसंघाने कौल देऊ नका. निवडणुकीमध्ये उभे असलेले प्रत्येक उमेदवाराचे व्यवस्थित अभ्यास करा. त्याचे राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये किती योगदान आहे ते पहा व त्याचे चारित्र्य कसे आहे ते ही पहा. आपल्या शहरातील विकास कार्यासाठी शासकीय व निमशासकीय निधी उपलब्ध करून देऊ शकतो का? सरपंच म्हणजे काय आणि त्याच्या जबाबदार्‍या काय आहेत याची माहिती आहे का? ते पहा आणि मग एकाद्या सक्षम उमेदवार निवडा. आपण एकविसाव्या शतकात जगतोय व आपल्यातील बहुतांश जनक आज सुशिक्षित आहेत. त्यामुळे जागे व्हा, उघड्या डोळ्याने पहा आणि मग निर्णय घ्या असे आव्हान पत्रकार आदित्य रमेश गोरेगांवकरांनी जनते पुढे केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]