नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हवामान आधारित फळपीक विमा योजनेला सुरुवात बागायत मालकांनी योजनेचा लाभ घ्यावा. श्रीवर्धन कृषी अधिकारी दौलत कुंभार – आजचा महाराष्ट्र

हवामान आधारित फळपीक विमा योजनेला सुरुवात बागायत मालकांनी योजनेचा लाभ घ्यावा. श्रीवर्धन कृषी अधिकारी दौलत कुंभार

प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- राज्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादकेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून कृषी विभागा मार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते येत्या आंबिया बहारासाठी योजनेमध्ये सहभागा करता विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून कमी किंवा जास्त तापमान वेगाचा वारा गारपिट व सापेक्ष आद्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागाचे संरक्षण करा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी शिवरधन दौलत कुंभार यांनी केले आहे. रायगड विभागांमध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना युवा संरक्षण देण्यात येईल यामध्ये आंबा काजू फळपीक वय पाच वर्ष कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदस्य योजना लागू असून एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकांसाठी चार हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल विमा अर्ज सोबत फळबागेचा Geo tagging असलेला फोटो विमा पोर्टल वर अपलोड करणे गरजेचं आहे आंबा पिकासाठी विमा संरक्षण रक्कम १४०००० रु व विमा हप्ता २९४०० रु व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम१०००००रु व विमा हप्ता ५००० रु असा असणार आहे. संभवीत हवामान डोके हवामान केंद्रावर पर्जन्यमान तापमान वारा वेग आद्रता इत्यादी माहिती स्वयंचलित रित्या नंदवली जाते या माहितीच्या आधारे अवेळी पाऊस कमी जास्त तापमान व आरा वेग त्याच प्रमाणे गारपीट या हवामान धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी यांना फळ पिकांसाठी विमा संरक्षण मिळते. सदर हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते. रायगड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिया कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत असून योजनेमध्ये सहभागी होण्याचे अंतिम मुदत काजू व आंबा पिकाकरिता ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत आहे. या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र csc बँक तसेच www. Pmfby. gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरता येणार असून अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागाची संपर्क साधण्याचे तसेच पिक विमा साठी फळ पिकांची नोंद सातबारा उतारा वरती बंधनकारक असल्याने ही पीक एफ द्वारे फळ पिकांच्या नोंदी करून घेण्याचे आवाहन दौलत कुंभार यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]