जालना शहरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

जालना :- दिनांक ०७/१०/२०२३ याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना शहरात कमालीची घाण झाली असून सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिकेच्या ढिसाळ व गलथान कारभारामुळे शहरात जागोजागी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत असून सगळीकडे कचरावर घाण झाली आहे. पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या गायब झाल्याची चर्चा शहरातील नागरिक करत आहेत.शहरात कॅरी बॅग वापरावर बंदी घालण्यात आली होती. परंतु त्याचीही ऐशीतैशी करण्यात आली आणि शहरात पुन्हा कॅरी बॅग चा सर्रासपणे वापर केला जात आहे.याकडेही स्थानिक पालिका प्रशासन कानाडोळा करत आहे.त्यामुळे शहरात रोडवर कॅरीबॅग सहित प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढीग साचल्याचे दिसत आहे. शहरांमध्ये स्वच्छतेचे तीन -तेरा वाजले असून सगळीकडे कमालीची घाण झाली या घाणीमुळे मच्छरांची उत्पत्ती वाढली आहे आणि त्यामुळे शहरात डेंग्यूने थैमान घातले असून शहरात शेकडो डेंगूचे पेशंट पाहायला मिळत आहेत ही परिस्थिती केवळ पालिकेच्या गलथान व नाकर्तेपणामुळेच निर्माण झाली असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत.
याकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिकेच्या घंटागाड्या केवळ शोभेची वस्तू म्हणून पालिकेच्या आवारात उभ्या आहेत. त्या केवळ पालिकेत शोभेच्या वस्तू म्हणून ठेवले आहेत काय ?असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरात डेंगूणे थैमान घातले असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यावर पालिका प्रशासन काय उपाययोजना करणार आहे किंवा नाही की, नागरिकांचे जीव घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













