नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पावसाअभावी पूर्णतः नुकसान होऊन देखील पीकविमा कंपनी नुकसानीचा दावा फेटाळत असल्याने आम्ही भरलेला हक्काचा 1 रुपया परत द्या – आजचा महाराष्ट्र

पावसाअभावी पूर्णतः नुकसान होऊन देखील पीकविमा कंपनी नुकसानीचा दावा फेटाळत असल्याने आम्ही भरलेला हक्काचा 1 रुपया परत द्या

प्रतिनीधी श्रीकृष्णा शेळके

शेतकरी पुत्रांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे मागणी

दुष्काळ,अपुरा पाऊस,पावसातील खंड, पूर, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकाच्या उत्पन्नात येणाऱ्या घटिपासून व्यापक विमा सरंक्षण या योजनेद्वारे शासनातर्फे शेतकऱ्यांना विमा दिला जातो यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पिकांचा विमा भरता येणार असल्याचे जाहीर केले होते.त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पिकांचा विमा भरला होता. परंतु गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने पिके पूर्णतः खराब झाली त्याबद्दलच्या तक्रारी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या ऑनलाईन साईटवर देखील केल्यात मात्र कंपनीकडून नुकसानीचा दावा फेटाळला जात असल्याचे मॅसेज येत आहेत.पिकांचा विमा काढलेला असतांना आणि नुकसान झालेलं असतांना देखील युनिव्हर्सल सोम्पो जनरल युन्शुरन्स कंपनीकडून दावे फेटाळले जात असल्यामुळं भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे,लिंगेवाडी येथील शेतकरी पुत्रांनी हक्काचा व कष्टाचा 1 रुपया परत अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके

यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
आम्ही प्रधान मंत्री फसल बिमा योजना अंतर्गत पिकांचा विमा उतरिवला होता.गेल्या महिनाभरपासून पाऊसाचा खंड पडल्याने पिके पूर्णतः खराब झाली आहेत.दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सोयाबीन,मका,कपाशी,उडीद,मूग,तूर आदी पिके पावसाचा खंड पडल्याने पूर्णतः खराब झाली असून उत्पादनात घट झाली आहे.यांसदर्भात विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.परंतु विमा कंपनीकडून प्रिय ग्राहक, आपला युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स –प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पीक नुकसानीचा, 31/08/2023 दिनांकाचा दावा क्रमांक MH1000183846, अर्ज क्र. 040127230080342815302,दुष्काळ/ कमी पावसामुळे होणारे पिकाचे नुकसान आणि पीक काढणी नंतरची जोखीम ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार व मार्गदर्शक तत्त्वांनुसार समाविष्ट नाही. ह्या कारणास्तव:तुमचा पीक नुकसानीचा दावा फेटाळला गेला आहे असे मॅसेज येत आहे. पिकांचा पालापाचोळा झालेला असतांना प्रशासनाने पंचनामे करायला हवे होते परंतु ते केले नसल्याने विमा कंपनीकडून देखील शेतकऱ्यांची थठ्ठा करण्याचा प्रकार सुरु आहे. पूर्णतः पिके नष्ट झाल्यात जमा असून उत्पन्न घटले आहे.नुकसान होऊन देखील आमच्या नुकसानीचे दावे फेटाळले जात असतील तर आम्हाला नकोय पिकांचा विमा.त्यामुळं आमच्या हक्काचा भरलेला 1 रुपया आम्हाला परत पाहिजे. आमचा हक्काचा 1 रुपया आमच्या खात्यात जमा करावा.जेणेकरून कष्टाचे पैसे वाया जाणार नाही.तसेच जालना येथे अबंड चौफोली वर असलेले विमा कंपनीचे ऑफिस देखील बंद असल्याचे आढळून आले.कृषिविभाग शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही मग शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे असे निवेदनात म्हटले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना निवेदन देतांना शेतकरी नारायण लोखंडे,साईनाथ साबळे.

प्रतिक्रिया
पिक पेरणीपासून काढणीपर्यतंच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे,गारपीट,अतिवृष्टी, चक्रीवादळ,पूर क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ,पावसाचा खंड,किड व रोगामुळे उत्पन्नात होणारी घट आदींसाठी पीकविमा मंजूर करण्याची तरतूद आहे. दुष्काळाची परिस्थिती,अपुरा पाऊस,पावसाचा खंड असतांना देखील कंपनीकडून नुकसानीचे दावे फेटाळले जात आहे.त्यामुळं कष्टाचा व हक्काचा 1 रुपया वापस देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
नारायण लोखंडे – शेतकरी पुत्र.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]