जमिनीचे दर पुन्हा कडाडणार विविध प्रकल्पामुळे रिअल इस्टेटचे दर वाढणार

रायगड (रोहा) :- रायगड जिल्हातील उत्तर रायगड आणि दक्षिण रायगडातील जमिनीचे दर पुन्हा एकदा आकाशाला भिडणार आहेत जमिनी खरेदी -विक्रीच्या व्यवहारांना आता जोर चढणार असल्याने दलालांची टोळी रिअल इस्टेट माकॅटमध्ये सक्रिय होत आहे ,त्यामुळे कायदेशीर बाबी तपासूनच व्यवहार सल्ला तज्ज्ञांमाफॅत दिला जात आहे ,रायगड जिल्ह्याचा काही भाग मुंबई महानगर प्रदेश एमएमआर मध्ये समाविष्ट करण्याला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे एमएमआरची हद्द आलिबाग, पेण,आणि खालापूर तालुक्यापर्यत वाढल्याने आगामी कालवधीत मोठया संख्खेने विविध प्रकल्पाना चालना मिळणार आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जमिनीचे दर वाढणार आहेत २००६साली एकट्या रायगड जिल्ह्यात मंजुरी देण्यात आलेल्या २६ एसईझेड सेझ
प्रकल्पाना प्रखर विरोध करण्यात आला होता त्यामध्ये प्रामुख्याने रिलायन्सचा महामुंबई सेझचा समावेश होता, बोगस व्यवहार मोठ्या संख्खेने होण्याची शक्यता, या पाहणीत त्यामुळे जमिनीचे दर वाढणार तर आहेत, शिवाय जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे दलाल यात असणार आहेत त्यामुळे व्यवहार करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच व्यवहार करावेत अशा वेळेला बोगस व्यवहार मोठ्या संख्येने होण्याची शक्यता असते, असा सल्ला अॅड सजय गुजर यांनी बोलताना दिला भूमिपुत्राना आतापर्यंत कोणत्याच कंपन्यानी न्याय दिलेला नाही त्यामुळे प्रकल्प उभारताना स्थानिकांचा प्रथम विचार होणे अतिशय गरजेचे आहे असेही त्यानी स्पष्ट केले ,रायगड मधील महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कोॅरिडोॅर, मुबंई ट्रान्स हाबॅर लिंक, आलिबाग-विरार एक्सेस कोॅरिडोॅर यासह अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत त्याचप्रमाणे आता रायगड जिल्ह्यातील आलिबाग, पेण,,आणि खालापूर तालुक्यापर्यत एमएमआरने आपली हद्द वाढवली आहे औधौगिक टाऊनशीप उभारण्यासाठी आलिबाग, मुरुड,रोहा आणि म्हसळा तालुक्यातील ४० गांवातील जमिन संपादित केली जाणार आहे,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













