जय श्रीकृष्ण पॅनल विजयी; महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट पंचवार्षिक निवडणूक

रायगड (तळा) :- महाराष्ट्रातील दाभोळी गवळी ज्ञाती बांधवांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट यांचे मुख्य कार्यालय दादर येथे आहे.या संस्थेच्या विश्वस्तांची पंचवार्षिक निवडणूक २० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण सभागृह दादर मुंबई येथे शांततेत पार पडली
पहिल्यांदाच पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जावे लागले असल्याने या निवडणुकीची रंगत वाढली होती.जय श्रीकृष्ण पॅनल आणि सुदर्शन चक्र परिवर्तन पॅनल या निवडणुकीमध्ये उभे होते या दोन पॅनल मधून विश्वस्त निवडून जाणार होते जय श्रीकृष्ण पॅनल वर मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचे आरोप करत सुदर्शन पॅनल ने आवाहन उभे केले होते.या निवडणुकीला ३५०० समाज बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावला हे मतदान आवाजी मतदानाने पार पडले.यामध्ये जय श्रीकृष्ण पॅनल ला ९८% मतदारांनी पसंती दिली व विजयी केले.तर केवळ २% समाज बांधवांनी सुदर्शन चक्र परिवर्तन पॅनल यांना मतदान केल्यामुळे त्यांचा या निवडणुकीत 
पराभव झाला.सुदर्शन चक्र परिवर्तन पॅनल यांनी केलेल्या आरोपांना समाजबांधवांनी महत्व दिले नसून जय श्रीकृष्ण पॅनलच्या उमेदवारांना ५ पाच वर्षे काम करण्याची संधी दिली आहे. ट्रस्ट मध्ये मागील पाच वर्षे पदाधिकारी आणि विश्वस्त यांनी काम करत असताना महाराष्ट्रातील एकूण २५ शाखा आहेत या शाखांसोबत संवाद साधणे त्यांच्या अडचणी दूर करणे संस्थेची ध्येये व उद्दीष्टे समाजबांधवांपर्यंत पोहोचवून संस्थेच्या समाजकार्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेणे, समाज बांधवांमधील शैक्षणिक व सामाजिक पातळी उंचावण्याकरिता संस्थेच्या शाखांचा विस्तार करणे यात अग्रेसर राहून विश्वस्त,पदाधिकारी आणि समाज बांधव यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे बहुसंख्य समाज बांधव यांनी जय श्रीकृष्ण पॅनलच्या उमेदवारांना विजयी केले असल्याचे मत समाज बांधव व्यक्त करत आहेत.या निवडणुकीत जय श्रीकृष्ण पॅनलचे प्रमुख म्हणून अजय बिरवटकर तर सहप्रमुख म्हणून अशोक दाते यांनी जवाबदारी पार पाडली.महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे 
यांच्याकडून शुभेच्छामहाराष्ट्र यादव चॅरइटई ट्रस्ट पंचवार्षिक निवडणूक पार पडल्या नंतर दादर मुंबई येथील श्रीकृष्ण सभागृहात महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत निवडणूक ठिकाणी भेट देऊन श्री कृष्ण पॅनलच्या विजयी उमेदवारांचे पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले. येणारया कालखंडात ट्रस्टच्या सर्वांगीण विकासासाठी आपण तत्पर असल्याचे अभिवचन यावेळी सर्व समाज बांधवांना दिले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













