नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत तळा शहरात फिरते कलश – आजचा महाराष्ट्र

मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत तळा शहरात फिरते कलश

प्रतिनीधी संजय रिकामे

रायगड (तळा) :- मेरी माती मेरा देश’ मोहिमेअंतर्गत देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर तळा नगरपंचायतीच्या वतीने तळा शहरात माती कलश फिरविण्यात आले.नगरपंचायत कार्यालय येथून चार चाकी विद्युत रोषणाई ने

सजवून तळा शहरात फिरविण्यात आली.शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या प्रभागातील माती या कलशामध्ये गोळा केली.माती गोळा केलेला कलश तळा नगरपंचायत कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला जाणार आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून कलशांमध्ये माती वाहून ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. या प्रवासात देशाच्या विविध भागातून

झाडेही आणली जातील कलशांमध्ये आलेली माती आणि वनस्पती यांचे मिश्रण करून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ बांधण्यात येणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ देखील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक असेल.या कार्यक्रमा प्रसंगी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,मुख्याधिकारी माधुरी मडके,नगरसेवक,नगरसेविका,नगरपंचायत अधिकारी,कर्मचारी आणि तळेवसी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]