वावे हवेली गावाच्या पुनर्वसनासाठी खा.सुनील तटकरे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

रायगड (तळा) :- तळा तालुक्यातील वावे हवेली गावाला धरण व दरडीचा धोका असल्यामुळे हे गाव आपादग्रस्त जाहीर व्हावे व त्यांचे पुनर्वसन व्हावे या करिता ग्रामस्थ मंडळ यांनी राष्ट्रवादी काँगेस पार्टी सुतारवाडी येथील कार्यालयात खा.सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते.यावेळी ग्रामस्थांच्या भावना समजून 
घेऊन खा.तटकरे यांनी वावे ग्रामस्थ यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर केले आज (दि.१४ ऑगस्ट) रोजी हे निवेदन तळा तहसीलदार स्वाती पाटील यांना देण्यात आले.यावेळी रायगड जिल्हा सामाजिक न्याय अध्यक्ष उत्तम जाधव, उपजिल्हा अध्यक्ष कैलास पायगुडे माजी पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत राऊत,सोनसडे ग्रामपंचायत सरपंच सरपंच माधुरी पारावे, वावे हवेली ग्रामस्थ अध्यक्ष महादेव पारावे, बाळकृष्ण थिटे,राम सावंत,बाळू वारंगे केशव पारावे,सागर पारावे देवा परावे परशुराम सावंत खेळुराम पोटले,गजानन पारावे,कृष्णा चाळके,सचिन कदम, प्रवीण अंबारले, कांतीलाल कजबले, सुरेन्द्र किजबीले, वावे हवेली ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वावे हवेली गावाच्या पूर्वेस लघुपाट बंधारे खात्याचे धरण व उत्तरेस दरड डोंगर असल्यामुळे गावाला पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यावर धरण फुटण्याची व दरड कोसळण्याची दाट शक्यता असते 
तसेच धरणाच्या भिंतीचा काही भाग खचलेला आहे. मागील चार ते पाच वर्षात दोन वेळा दरडीचा काही भाग खाली कोसळल्यामुळे घरांना तसंच जीविताला धोका निर्माण झाला आहे याची पाहणी तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात आली आणि तात्पुरत्या स्वरूपात ग्रामस्थ यांचे स्थलांतर करण्यात आले आले तरी प्रत्येक वर्षी पावसाच्या भीतीपोटी रात्र रात्र जागून काढावी लागत आहे याबाबत ग्रामस्थांनी मागील पंधरा ते वीस वर्षात शासन दरबारी पत्रव्यवहार केला असून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही तरी वावे हवेली गाव आपत्तीग्रस्त जाहीर करून त्यांच्या गावाचे पुनर्वसन त्यांच्या गावाच्या शिवारात असणाऱ्या गट नंबर ३६ या जागेमध्ये करण्यात यावे तसेच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर तहसीलदार तलाठी ग्रामसेवक यांच्याकडून ग्रामस्थांना दरवर्षी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या जातात मात्र पुनर्वसन होत नाही तरी यासाठी काळजीपूर्वक लक्ष देऊन पुनर्वसन व्हावे याकरता खा.सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना शिफारस केली आहे.लेखी निवेदन सादर केले आहेच त्याच बरोबर जिल्हाधिकारी यांच्याकडे फोन वर संपर्क साधून अती तातडीने याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना खा.तटकरे यांनी दिल्या असल्याने वावे ग्रामस्थ यांनी खा.सुनील तटकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













