गोरेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांना वंदन

रायगड (माणगाव) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘माझी माती, माझा देश’ अंतर्गत गोरेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने गोरेगांवमधील स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मातीचे संकलन करण्याचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या स्वातंत्र्य सैनिकांना वंदन कार्यक्रमात दिवंगत स्वातंत्र्य सैनिक कै. नथूराम शेठ, कै. बंडू बेंडखळे, कै. विष्णूपंत खुळे, कै. विष्णू दानवे, कै. शंकर दानवे, कै. रामचंद्र पेठे, कै. विष्णू मेहता यांचे सुपुत्र अनुक्रमे दिलीप शेठ, श्रीनिवास बेंडखळे, पत्रकार केदार खुळे , सुनिल दानवे, रवींद्र दानवे, मंगेश पेठे, विकास मेहता यांना सरपंच झुबेर अब्बासी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्रीनिवास बेंडखळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामविकास अध्किारी प्रभाकर पोळेकर यांनी केले. या कार्यक्रमास सरपंच झुबेर अब्बासी, उपसरपंच दिनेश उचाटे, सदस्य चंद्रकांत गोरेगांवकर, विनोद बागडे, दिनेश गोरिवले, रोहित शिंदे, खलील बहूर, राजेंद्र गोविलकर, सौ. संघमित्रा गायकवाड, सौ. कामिनी महाडीक, सौ. धनश्री म्हशेळकर, सौ. किशोरी तांबडे, सौ. गौरी डोळस, लोकनेते माजी सरपंच विजयराज खुळे, माणगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार विवेक दोशी, ग्रामविकास अधिकारी श्री. पोळेकर, माजी सदस्य सूरज पवार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













