भानंग ग्रामपंचायत माझी माती माझा देश अभियानास प्रारंभ

रायगड (तळा) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी का नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’हे अभियान भानंग ग्रामपंचायत येथे (दि ११ ऑगस्ट)ग्रामसभा दरम्यान राबविण्यात आले या अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत भानंग तर्फे निवृत सैनिक सुरेश वडके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देऊन नमनासाठी ‘शिला फलक’उभारण्यात आले या फलकावर स्थानिक शहीद, वीर, स्वातंत्र्यसैनिकांची नावे असतील हे शिला फलक १५ ऑगस्टपर्यंत उभारण्यात येणार आहेत या शिलाफलकचे अनावरण व ध्वजरोहण निवृत सैनिक सुरेश वडके यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे वसुधा वंदन’ उपक्रमात प्रत्येक गावात देशी रोपांची लागवड करून ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार असल्याचे माजी सरपंच रघुनाथ वाघरे यांनी सांगितले.

हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे.प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन ग्रामसेवक खंडू काळे यांनी यावेळी केले.या कार्यक्रमासाठी माजी सरपंच रघुनाथ वाघरे,ग्रामसेवक खंडू काळे,माजी सदस्या
सौ.सुलोचना रेवाळे,.कानु विचारे,यशवंत वाघरे,महादेव वाघरे,सुरेश धाडवे,हरिशचंद्र धाडवे,राजिप शाळा मुख्यध्याप्क श्री.गिरी ,प्रशासक श्री.झोरे, सौ.गिरी,अंगणवाडी सेविका मदतनीस,ग्रामपंचायत शिपाई,कर्मचारी, सर्व ग्रामस्थ,महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













