नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या पुतळ्या व समाधी बाबत मा. डॉ. अभिजित चौधरी,(भा. प्र.से.),प्रशासक, नागपूर महानगर पालिका यांना निवेदन – आजचा महाराष्ट्र

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या पुतळ्या व समाधी बाबत मा. डॉ. अभिजित चौधरी,(भा. प्र.से.),प्रशासक, नागपूर महानगर पालिका यांना निवेदन

प्रतिनिधि संजीव भांबोरे

नागपुर :- महानगर पालिका मुख्य कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या विधानभवन समोरील नागपुर नगरीचे संस्थापक गोंड राजे यांच्या पुतळा परिसरात दिनांक ३० जुलै २०२३ त्यांच्या जयंती दिनी अस्वच्छता पसरलेली होती. नागपूर महानगर पालिकेला पत्र देवून सुध्दा फायर ब्रिगेड गाडी द्वारा पुतळा पाण्याने धुतला नाही, पुतळा समितीचे अध्यक्ष महानगर पालिका उपमहापौर असतात व त्यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातो सद्या निवडणुका न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही परंतु जबाबदार वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व एका साध्या कर्मचार्‍याद्वारे २० रुपयाचा छोटा हार घेवून १० वाजता हार घालण्यासाठी पाठविले परिसराची दैना अवस्था बघून आदिवासी समाज बांधवांनी त्यांना पुष्पहार अर्पण न करू देता परत पाठविले व

निषेध नोंदविला. ज्या गोंड राजाने नागपूर शहर वसविले त्यांचीच अशी अनास्था नागपूर महानगर पालिका प्रशासनाकडून होणे म्हणजे महाराजांचा व आदिवासी समाजाचा अपमान आहे कृपया तात्काळ दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल संघटनेस कळवावा, भविष्यात अशा चुका होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी,आदिवासी समाजाच्या वतीने वारंवार मागणी करूनही पुतळा परिसरात सी.सी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही त्यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नागपूर महानगर पालिका प्रशासनाची राहील याची आपणास पुनश्च एकदा आठवण करून देण्यात येत आहे, पुतळ्याच्या हातातील तलवारीची मूठ तुटलेली आहे,आजूबाजूला असलेल्या तोफा सुध्दा क्षतिग्रस्त झाल्या आहेत तसेच गोंड राजे बक्त बुलंद शहा यांचे सक्करदरा नागपूर येथील समाधी स्थळाचा प्रलंबित विकास विषय सुद्धा निकाली काढण्यात यावा,आदिवासी समाजाला तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्यास बाध्य करू नये अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग द्वारा करण्यात आली यावेळी दिनेश शेराम, कृष्णराव परतेकी, सूर्यकांत उईके,दिनेश सिडाम,राहुल मडावी, विजय परतेकी, स्वप्नील मसराम, वनश्री सिडाम, गंगा ताई टेकाम, शंभू कोहचाडे, ऋषिकेश सलाम आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]