रोवणी आटोपली अन् विद्युत खांब कोसळले, दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी नाही

विद्युतविभागाचा भोंगळ कारभार विद्युत अभावी धान रोवणी खोळंबली
भंडारा :- जिल्हयात मुसळधार पावसाचे आगमन झाले आणि शेतकरी वर्ग सुखावला. शेतात येणारे पऱ्हे डोलु लागले व शेतकरी वर्ग धान रोवणी साठी सज्ज झाला. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, उपविभाग मानेगाव अंतर्गत येणाऱ्या सिल्ली येथील शेतक-यांच्या शेतातील रोवणी आटोपली आणि काही वेळातच विद्युत खांब कोसळले मात्र त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही हे महत्वाचे आहे . आणि विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार रस्त्यावर आला आहे. परिणामी त्या परिसरातील विद्युत पुरवठा पाच दिवसांपासुन खंडित करण्यात आलेला होता विद्युत वाहिनी पूर्ववत सुरू करून विद्युत अभावी खोळंबलेली रोवणी पुर्ण होण्यास मदत होईल. याकडे विद्युत विभागाने जातीने लक्ष द्यावे व संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी सिल्ली येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहिती नुसार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, उपविभाग मानेगाव अंतर्गत येणाऱ्या सिल्ली येथील शेतक-यांच्या शेतावर नवीन कनेक्शनवर देण्यासाठी वाढीव खांब (पोल) उभे करण्यात आले होते. या संदर्भातील कामाची जबाबदारी ठेकेदार मूलचंदानी यांना देण्यात आली असल्याचे मत शेतकऱ्यांनी सांगितले.स्मशानभूमी परिसरातील शेतकरी विनोद तिडके, ईस्तारी मस्के, सखाराम मस्के, भूदेव क्षीरसागर, जितेंद्र क्षीरसागर, गुड्डू क्षिरसागर यांच्या शेतातून इलेक्ट्रिक (पोल) खांब नेण्यात आले आहे. पण ते खांब दीड ते दोन फूट खड्डे खोदून पोल लावण्यात आले. तसेच त्या खड्ड्यात कोणतेही दगड न टाकता किंवा मास काँग्रेट न घालता मातीने बुजवण्यात आले. आणि वरून फक्त वरुन सिमेंट मास काँग्रेटचा मुलामा चढविण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात काही फरक पडत नाही. मात्र पावसाळा सुरू झाला की जमिनीत पाणी मुरत असते. आणि ती जागा मऊ होत असते. हे अशिक्षित, अडाणी माणसाला समजते. मात्र विद्युत विभागात नौकरीला असणाऱ्या अभियंत्याला का कळत नाही. हे एक कोडेच आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात रोवणीची कामे युध्द पातळीवर असतांना पंधरा ते विस मिनीटाच्या नंतर खांब (खाली) जमिनीवर म्हणजेच शेतात कोसळल्याने दुर्दैवाने मोठी जीवित हानी टळली आहे. आणि कदाचित शेतकरी व मजूर वर्गाची जीवित हानी झाली असती तर जीवित हानी भरून दिली असती का? याला जबाबदार कोण असतां? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. संबधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे व मानेगाव विद्युत विभागातील अभियंत्याच्यानिष्काळजी पणामुळे शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला असता. विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार रस्त्यावर येऊन पितळ उघडे पडले आहे.
यापुढे शेतकरी वर्गाची कोणत्याही प्रकारची जीवित हानी व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच पडलेले खांब त्वरित उभे करून विद्युत प्रवाह नियमित करण्यात यावा. जेणे करून विद्युत अभावी खोळंबलेली रोवणी पुर्ण होण्यास मदत होईल. याकडे विद्युत विभागाने जातीने लक्ष द्यावे व संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी विनोद तिडके, ईस्तारी मस्के, सखाराम मस्के, भूदेव क्षीरसागर, जितेंद्र क्षीरसागर, गुड्डू क्षीरसागर व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













