नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सोन्याच्या वाडीला पुराच्या पाण्याचा वेढा; ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले – आजचा महाराष्ट्र

सोन्याच्या वाडीला पुराच्या पाण्याचा वेढा; ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले

प्रतिनिधि पांडुरंग माने

प्रांताधिकारी, तहसिलदार यांची सोन्याच्या वाडीची पाहणी

रायगड (माणगाव) :- तालुक्यात गेली काही दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सतत कोसळणार्‍या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी वाहू लागल्या असून गोरेगांवमधील काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पुराच्या पाण्याने चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील सोन्याच्या वाडीला घेरले असुन या पाण्यात अडकलेल्या सर्व ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांमध्ये एका ९० वर्षीय आजीला इरलीमध्ये बसवुन खाद्यांवर घेत पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढली या

वेळी पोलिस सहाय्यक निरिक्षक श्रीकृष्ण नावले, सरपंच नंदकुमार पारावे, तलाठी कदम उपसरपंच किशोर तटकरे सदस्य चंद्रकांत होळकर ,सदस्य विलास यादव, सदस्य उत्तम कांबळे, चिंचवली ग्रामपंचायत कर्मचारी नरेश कलेकर, मंडळ अधिकारी सानप साहेब, कोतवाल भादवकर ,, माणगाव तहसीलदार साहेब, माणगाव प्रांत अधिकारी साहेब, पत्रकार प्रसाद गोरेगावकर, गिरीश गोरेगावकर ,पांडुरंग माने, राज पारावे व पोलीस उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]