नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन…. – आजचा महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन….

प्रतिनिधी

ठाणे :- (आ. मा. टॉ. टे. न्यू )ठाणे ऍग्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशन जिल्हा – ठाणे यांच्यावतीने जाहीर करण्यात येते कीशनिवार दिनांक.१५ ऑगस्ट २०२६ पासून अनुदानित रासायनिक खतांच्या खरेदीसाठी नवीन ऑनलाइन बुकिंग प्रणाली लागू होत आहे.महाराष्ट्र शासनामार्फत ठाणे जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसाठी नवीन ऑनलाइन बुकिंग प्रणाली लागू करण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये

खत खरेदी करण्यापूर्वी Farmer ID च्या आधारे ऑनलाइन बुकिंग करणे आवश्यक राहणार आहे.नवीन प्रणालीची सुरुवात होत असल्यामुळे प्रारंभी काही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

शेतकरी बांधवांसाठी सूचना :

✅ ज्या शेतकरी बांधवांना पुढील १५ ते २० दिवसांत रासायनिक खतांची प्रत्यक्ष आवश्यकता आहे, त्यांनी शक्य असल्यास दि.१५ ऑगस्ट २०२६ पूर्वीच आपल्या गरजेनुसार आवश्यक खते जवळच्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून ठेवावीत.

✅ Farmer ID व इतर आवश्यक माहिती उपलब्ध ठेवावी.

✅ कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाकडून येणाऱ्या पुढील सूचनांचे पालन करावे.

✅ अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अधिकृत कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

महत्त्वाची सूचना

हे आवाहन कोणतीही भीती किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या उद्देशाने नसून, नवीन ऑनलाइन प्रणालीच्या प्रारंभी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी व शेतकऱ्यांची वेळेवर खतांची गरज पूर्ण व्हावी, या उद्देशाने करण्यात येत आहे.

“आपल्या पिकांना योग्य वेळी खत मिळणे हीच आमची प्राथमिकता… शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आवाहन.” 

– जनहितार्थ प्रसिद्ध –

 “हे आवाहन शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असून, कोणतीही भीती किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा उद्देश नाही.”

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]