व्हॉइस ऑफ मिडियाच्या माणगाव तालुका अध्यक्ष पदी पत्रकार राम भोस्तेकर यांची निवड

रायगड (माणगाव) :- खोपोली येथे नुकत्याच झालेल्या व्हॉइस ऑफ मीडिया आयोजित मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप काळे यांच्या आदेशानुसार कोकण उपाध्यक्ष प्रविण कोळआपटे याच्या शिफारशीनुसार जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गांगवणे यांनी माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे प्रसिध्दी प्रमुख राम भोस्तेकर यांची व्हॉइस ऑफ इंडिया माणगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली.

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचा कोकण मेळावा खोपोली येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या सामाजिक, कौटुंबिक ,शैक्षणिक अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी हि संघटना काम करणार असून तसेच शासनदरबारात अनेक पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली. तसेच माणगाव तालुका उपाध्यक्ष पांडुरंग माने, सचिव किरण शिंदे, सह सचिव नंदकुमार चांदोरकर, संघटक नितेश पुराकर, सदस्य हारेश मोरे,महेश शेलार, आशी माणगाव तालुका कार्यकरणी नियुक्ती करून नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप काळे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी माणगाव तालुका अध्यक्ष यांनी सांगितले कि हा सन्मान माझा नसुन मला ज्यांनी या पत्रकार क्षेत्रात काम करण्याची संधी दिली वेळोवेळी मार्गदर्शन केले ते माझे पत्रकार क्षेत्रातील गुरू पत्रकार प्रमोद जाधव यांना समर्पित करतो. त्यांच्या मुळे आज मी या क्षेत्रात काम करत आहे. या पुढे पत्रकार क्षेत्रातील माझ्या पेक्षा जेष्ठ पत्रकारांचे आशिर्वाद घेऊन त्यांचा मानसन्मान राखून त्याचे मार्गदर्शन घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आईस ऑफ मीडिया मार्फत आपण प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर माणगाव तालुक्यातील सर्व माझ्या पत्रकार बांधूनी एकत्र येऊन आपलाच लढा आपणच उभा करण्यासाठी पत्रकारांनी एकजूट व्हावे असे आवाहन पत्रकार राम भोस्तेकर यांनी केले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













