नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘विद्यार्थ्यांनो, शिकाल तरच टिकाल’ — डॉ. किशोर पाटील – आजचा महाराष्ट्र

‘विद्यार्थ्यांनो, शिकाल तरच टिकाल’ — डॉ. किशोर पाटील

प्रतिनिधी

समाज कल्याण न्यासच्या वतीने शारदा विद्यालय, पडघा येथे आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

ठाणे – भिवंडी (आ. मा. टॉ. टे. न्यू ) :- ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी शारदा विद्यालय, पडघा येथे आदिवासी, गरीब व

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद पाटील यांनी समाज कल्याण

न्यासच्या या उपक्रमाचे स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे, आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळवून देणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थ्यांनो, शिकाल तरच टिकाल. त्यामुळे प्रत्येकाने मन लावून अभ्यास करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे आवाहन केले. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या

शुभेच्छा देत त्यांनी समाज कल्याण न्यासचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.यावेळी आर.एस.पी.चे नोडल ऑफिसर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीचा संदेश देत समाजात नशामुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी समाज कल्याण न्यासने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.हा संपूर्ण शैक्षणिक मदत उपक्रम समाज कल्याण न्यासचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लागणार असून, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केला.सदर कार्यक्रमास समाज कल्याण न्यासचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सोन्या काशीनाथ पाटील ,डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील (संपादक, दैनिक स्वराज्य तोरण), डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी (नोडल ऑफिसर, आर.एस.पी.), श्री. टारझन अनंता पाटील (उपतालुकाध्यक्ष, भिवंडी ग्रामीण), मुख्याध्यापक श्री. प्रमोद पाटील, सहशिक्षक श्री. मंगेश भामरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुयोग वेखंडे यांनी केले. तर समाज कल्याण न्यासचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांच्यासह संपूर्ण टीमचे आभार सहशिक्षक श्री. मंगेश भामरे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]