कल्याण (पश्चिम) येथे सुतार कौशल्य विकास कार्यक्रमातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, इन्स्ट्रुमेंट्स व सेफ्टी किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन!
प्रतिनिधी
ठाणे (कल्याण ) –डी .वाय. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.दयानंद मोतीराम चोरघे यांच्या संकल्पनेतून आमने-लोणाड विभागातील सुतार कारागिरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सुतार कौशल्य विकास कार्यक्रमाचा समारोप सोहळा रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, शिष्यवृत्ती तसेच सेफ्टी किट वाटप करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम रविवारी दुपारी २.०० ते सायं. ५.०० या वेळेत कल्याण (पश्चिम) येथील आचार्य आत्रे सभागृह येथे पार पडणार आहे. सुतार कामगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून आपले प्रमाणपत्र, इन्स्ट्रुमेंट्स आणि सेफ्टी किट स्वीकारावे, असे आवाहन अध्यक्ष श्री.योगेश पाटील यांनी केले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.दयानंद मोतीराम चोरघे,महीला प्रदेशाध्यक्षा सौ.प्रियंका दयानंद चोरघे,युवा प्रदेशाध्यक्ष श्री.विरेन दयानंद चोरघे, महीला ठाणे जिल्हाध्यक्षा सौ.चारूशिला गायकर सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डी. वाय. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एनजीओचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमात मोठ्या संख्येने सुतार कामगार व नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













