नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्मा श्री संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली विजबिलामधील वाढीव अनामत रक्कम विरोधात मोर्चा … – आजचा महाराष्ट्र

दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्मा श्री संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली विजबिलामधील वाढीव अनामत रक्कम विरोधात मोर्चा …

पत्रकार राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- कोकणातील जनता महापूर , कोविड महामारी , शेतीचे नुकसान , चक्री वादळ अशा अनेक संकटाना सामोरे जाऊन आता कुठे शेतकरी , जनता सावरली आहे. अशा अनेक संकटाना सामोरे जावे लागत असताना देखील कोकणातील नागरिक प्रामाणिकपणे विजबिल भरत असतात. मात्र नागरिकांना आता आलेल्या वीजबिलांमध्ये वाढीव अनामत रक्कम समाविष्ट करून बिले देण्यात आलेली आहेत 

तरी वाढीव अनामत रक्कम विजबिलांमध्ये समाविष्ट करून नागरिकांवर लादण्यात आलेल्या बिलांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्त्वाखाली तीनबत्ती नाका येथून मोर्चा काढण्यात आला. व वीजबिले पेटवून, घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

तसेच खेडमध्ये तहसीलदार , कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना वाढीव अनामत रक्कम रद्द करणे बाबत निवेदन देण्यात आले.

सदर वेळी शिवसेना , युवासेना , महीला आघाडी तसेच शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]