नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वडोदतांगडा येथे दारूबंदीसाठी सर्व गावकरी सरसावले – आजचा महाराष्ट्र

वडोदतांगडा येथे दारूबंदीसाठी सर्व गावकरी सरसावले

प्रतिनिधी श्रीकृष्ण शेळके

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदतांगडा हे गाव मागील कित्येक दिवसापासून

दारूबंदी या विषयावर चर्चेत राहिले आहे  या गावात सरकारी परवानाधारक दारू विक्रीच कुठलंही दुकान नसलं तरी मात्र या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशीदारू. गावरानदारू विक्री सध्या

मोठ्या प्रमाणात सुरू आहे,या सर्व त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालय वडोदतांगडा मार्फत काही दिवसांपूर्वी गावात दारूबंदीचा ठराव घेतला होता. मात्र हा ठराव नुसता कागदावरच राहिला त्यानंतर कित्येक घरांचे संसार या दारूपाई उध्वस्त झाले आहेत. तर कित्येक जणांनी दारूपायी कर्जबाजारी होऊन आत्महत्या सुद्धा केल्या आहेत.  या सर्व बाबी गावातील नवतरुण मंडळींना व महिलांच्या लक्षात आल्यानंतर आज या विषयावर गावातील मारुती मंदिरावर सकाळी साडेदहा वाजता सर्व गावकऱ्यांनी एक बैठक घेतली व यामध्ये निर्णय घेण्यात आला की गावात सुरू असलेली

अवैधदारू विक्री ही बंद करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा सुद्धा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे. या बैठकीच्या वेळी नव तरुणांमध्ये दारूबंदी करिता उत्सुकता पाहायला मिळाली आहे. तसेच गावात कायमस्वरूपी दारूबंदी व्हावी असा निर्णय सुद्धा यावेळी ग्रामपंचायत कार्यालय वडोदतांगडा तसेच

गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी शिक्षणप्रेमी व महिला वर्गांनी प्रशासनाकडे केला आहे. तसेच उद्या सकाळी नऊ वाजता पुन्हा मारुती मंदिरावर दारूबंदी विषयी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. आता प्रशासन या गावकऱ्यांच्या हाकेला धावून येतं का? व अवैधदारू विक्री करणाऱ्यांना रोखणार का? अशी खंत व भावना व्यक्त केली जात आहे. तसेच या निर्णयाकडे सर्व गावकरी शेकडो महिलांचेही लक्ष लागून राहिले आहे.अशी माहीती वडोदतांगडा येथिल सरपंच पदी विराजमान असलेले श्री वास्कर, श्री. आकाश तांगडे. डॉ . सी आर तांदूळजे तसेच नव्यानेच रुजू झालेले पारध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास घुसींगे यांनी चॅनेल सोबत बोलताना माहीती दिली आहे .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]