महाराष्ट्र भूषण डॉक्टर. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी शहर ते कुवारबाव व चंपक मैदान रस्त्याची महास्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली

रत्नागिरी (खेड) :- राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे राज्यपाल नियुक्त स्वच्छता दूत पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमध्ये महास्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. साळवी स्टॉप 
रत्नागिरी ते कुवारबाव व साळवी स्टॉप ते चंपक मैदान या रत्नागिरी कोल्हापूर हायवे वर स्वच्छतेसाठी शेकडो सदस्य झाडू, फावडे, घमेली घेऊन उतरले होते. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता मोहिमेचे उत्तम नियोजन करण्यात 
आले होते. शेकडो हात शिस्तीने कार्य करताना दिसत होते. हे चित्र समाजाला मार्गदर्शक व प्रेरणादायी होते. या महास्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या सदस्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आम्हाला राष्ट्रऋण, समाज ऋणाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे स्वच्छता मोहिमेसारख्या सेवेत कर्तव्य बजावताना आम्हाला आनंद होतो. अशा प्रतिक्रिया महास्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी सदस्यांकडून येत होत्या.१९५० सदस्यांनी सात किमीचा परिसर सहा तासात अत्यंत स्वच्छ व लखलखीत केला. सुमारे ९० टन कचरा गोळा करून रत्नागिरी नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला. अल्पावधीत परिसर स्वच्छ झाल्याचे पाहून अनेक समाज प्रतिष्ठितांनी सदस्यांना धन्यवाद देऊन, डॉक्टर नानासाहेब
धर्माधिकारी प्रतिष्ठानबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा अधिकारी मा. श्री. एम. देवेंद्रसिंह, माजीआमदार मा. श्री. बाळासाहेब माने, शिरगाव ग्रा.प. सदस्य श्री सचिन सनगरे, ग्रामविकास अधिकारी श्री सावके यांनी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या कार्याचे कौतुक करून धन्यवाद दिले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













