नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पंकज व प्रणव काताळे या दोन बंधूंची गायन व संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी – आजचा महाराष्ट्र

पंकज व प्रणव काताळे या दोन बंधूंची गायन व संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)-रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील आंबये गावातील कुमार पंकज तुकाराम काताळे व प्रणव तुकाराम काताळे या दोन बंधूंनी गायन व संगीत

क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पंकज व प्रणव हे गेलीआठ वर्षे गायन व संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सांस्कृतिककार्यक्रम, भजन, कीर्तन, नमन, भारुड, आर्केस्ट्रा कोकणातील लोककला शक्ती तुरा मुंबई, ठाणे, पुणे अशा इतर मोठ्या शहरांमध्ये थेटप्रक्षेपण कार्यक्रम करत आहेत. पंकज याने नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे. तर प्रणव हा ज्ञानदीप विद्यामंदिर खेड येथे बारावी मध्ये शिकत आहे. विशेष म्हणजे हे दोघेही स्वतः गाणी तयार करून स्वतः गायन करतात गाण्याला संगीतही स्वतः देतात. तसेच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की, पंकज काताळे यांनी यावर्षी गणपतीच्या निमित्ताने स्वतः तयार केलेले गणपतीचे गाणे हे गणा आतुरली धरती आज सारी…. हे गाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषता कोकणासह मुंबई पुणे ठाणे या मोठ्या शहरात ऐकायला मिळत आहे. पंकज व प्रणव काताळे या दोन बंधूंची आज पर्यंत ११ गाणी यूट्यूबवर पाहायला मिळत असून, या गाण्यांना रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे. हे दोघे बंधू असे म्हणतात की गायन व संगीत क्षेत्राची आवड आम्हाला आमचे वडील श्री तुकाराम भागोजी काताळे प्राथमिक शिक्षक व आई सौ तृप्ती तुकाराम काताळे प्राथमिक शिक्षिका यांच्या प्रेरित व प्रोत्साहित मार्गदर्शनाखाली मिळाले. ते पुढे असेही म्हणतात की कोकणातील लोककला टिकवून ठेवणे हाच आमचा उद्देश आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]