नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान – आजचा महाराष्ट्र

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

प्रतिनिधी

मुंबई :- आ.मा.टॉ.टे.न्यू दि. १४ :- राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दलएमआयडीसी व महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील १२ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. गेल्या काही दशकांत अग्निशमन दलासमोरील आव्हाने अनेक पटींनी वाढली आहेत. नागरीकरणउंच इमारतीभूमिगत व भुयारी मेट्रोतसेच वाढते औद्योगिक क्षेत्र यामुळे आपत्कालीन परिस्थितीचे स्वरूप गुंतागुंतीचे झाले आहे. मोठाली गोदामे आणि डेटा सेंटर्स ही काळाची गरज झाली आहेत. त्यामुळे औद्योगिक आगींपासून ते अत्याधुनिक डेटा सेंटर्स संबंधित आगीपर्यंत विविध प्रकारच्या आव्हानांना अग्निशमन दलांना सामोरे जावे लागत आहेअसे राज्यपालांनी सांगितले.अग्निशमन सेवा केवळ आग विझविण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधाऔद्योगिक संपत्ती आणि सार्वजनिक ठिकाणांचे संरक्षण करणे ही देखील तिची जबाबदारी झाली आहेअसे ते म्हणाले अलीकडच्या काळात गॅस व रासायनिक आगीतसेच ई-कार्स आणि इतर विद्युत उपकरणांमधील लिथियम-आयन बॅटरीमुळे आगींच्या घटना घडल्या आहेत. आग प्रतिबंधशोध आणि कारणांचे विश्लेषण आदी क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक आहेअसे राज्यपालांनी सांगितले. बदलत्या परिस्थितीत अग्निशमन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौशल्य वर्धनप्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा सातत्याने अद्ययावत करणे गरजेचे आहेअसे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात अग्निशमन सेवांच्या आधुनिकीकरणासाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत ६१४  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहेअसे सांगून हा निधी शहरी तसेच ग्रामीण भागात प्रभावी अग्निसुरक्षा सेवा पुरविण्यास निश्चितच मदत करेलअसे राज्यपालांनी सांगितले महाराष्ट्रात अग्निविज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी स्वतंत्र संस्थेची स्थापना करणे अथवा विद्यमान संस्थांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. यामध्ये आग नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा शोधपर्यावरणपूरक अग्निशामक साधनांचा विकास आणि औद्योगिक व बिगरऔद्योगिक आस्थापनांचे सर्वंकष अग्निसुरक्षा ऑडिट यांचा समावेश असावाअसे राज्यपालांनी सांगितले. याशिवायविद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना अग्निसुरक्षा सरावजनजागृती मोहिमा आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहेअसे त्यांनी सांगितले.यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुख्य अग्निशमन अधिकारीएमआयडीसी संतोष वारिक,  मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी अनिल परबमुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र रघु शेट्टीविभागीय अग्निशमन अधिकारी देवेंद्र पाटीलसब ऑफिसर  राजाराम कुदळेसब ऑफिसर अनंत धोत्रे,  लिडींग फायरमन  किशोर म्हात्रे,   लिडींग फायरमन   मुरलीधर आंधळेलिडींग फायरमन मोहन तोसकर,  लिडींग फायरमन   मुकेश काटेविभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगावकर व वरिष्ठ प्रशिक्षक किरण हत्याळ  यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या जॅकेटला अग्निशमन ध्वजाचे स्टॅम्प तिकीट लावले. राज्यपालांनी अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान दिले तसेच जनतेला निधीसाठी अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले.संचालक संतोष वारिक यांनी प्रास्ताविक केले तर मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाला मुंबई अग्निशमन दलऔद्योगिक आस्थापना तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अग्निशमन अधिकारी व पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.मुंबई डॉकयार्ड येथे सन १९४४  साली झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४  एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो तसेच या दिवसापासून अग्निशमन सप्ताह पाळल्या जातो.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]