जिल्हा प्रशासनाच्या तसेच राज्यातील सत्ताधारी यांच्या दुर्क्षतेने अलिबाग नगरीच्या प्रवेशद्वारी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी घेतला पुढाकार माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
रायगड (अलिबाग) – महाराष्ट्राची तिसरी मुंबई म्हणून नावारूपास येत असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण कडून अलिबाग कडे येणाऱ्या अलिबाग नगरीच्या प्रवेशद्वारी राज्यातील सत्ताधारी ,जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षतेमुळे अलिबाग नगरीच्या प्रवेशद्वारी पडलेले महाकाय खड्डे बुजविण्यासाठी अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी घेतला असल्याने या खड्डेमय रस्त्यापासून मुक्तता मिळणार आहे.रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे विविध कामासाठी पर्यटनासाठी जिल्ह्यासहित राज्यातील नागरिक ये जा करीत असतात.मात्र जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अलिबाग मध्ये येणारे नागरिक हे अलिबाग म्हणजे खड्ड्यांचे शहर 
म्हणून ओळख झाली आहे.या रस्त्याबाबत अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या खर्चाने प्रवेशद्वारी असलेले खड्डे भरण्याचे काम केले होते.मात्र संबंधित विभाग या रस्त्याकडे का कानाडोळा करीत आहेत याचा उलगडा काही होत नाही.या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पडून अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला गेला आहे. या रस्त्यावरून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यासहित प्रत्येक विभागाचे उच्च अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री ये जा करीत असतात मात्र त्यांना त्यांच्या आलिशान गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारे त्रास होत नसल्याने त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे.या रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर केंद्रातील तसेच राज्यातील सत्तेत मुख्य स्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यालय देखील आहे.या कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते ये जा करीत असतात.या मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत तो रस्त्याचं भाग सार्वजनिक बांधकाम विभाग की राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारित येतो आहे याची माहिती खुद्द जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने हे खड्डे कायमचे बुजवले जात नसल्याचे सांगण्यात आले.काही दिवसापूर्वी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात यावे याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत पत्र दिले होते; परंतू काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी याकामी पुढाकार घेतला.अलिबाग-रेवदंडा बायपास जंक्शन हा केवळ एक रस्ता नाही, तर अलिबागला वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. या रस्त्याची दुर्दशा गेली अनेक वर्षे नागरिकांसाठी आणि विशेषतः वाहन चालकांसाठी एक डोकेदुखी ठरली होती.खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि अपघातांचे वाढते प्रमाणामुळे या मार्गावरील प्रवास म्हणजे एक अग्निदिव्यच ठरत होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी या कामाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि बुधावारी यी कामाला प्रत्यक्षात सुरवातही केली आहे.या कामामुळे हा रस्ता अधिक सुरक्षित, वेगवान आणि प्रवासासाठी अधिक सोयीचा होणार असून, केवळ स्थानिक नागरिकांचीच नव्हे, तर पर्यटकांचीही सोय होणार आहे. अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हा मार्ग एक महत्त्वाचा प्रवेशद्वार आहे आणि तो चांगल्या स्थितीत असणे आपल्या पर्यटन व्यवसायासाठीही महत्त्वाचे आहे. रस्ते हे विकासाचे आरसे असतात आणि या दुरुस्तीमुळे अलिबागच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













