गोरेगावं पोलीस स्टेशन ची धडक कारवाई बाजारपेठ त बेकायदेशीर वाहने उभ्या करणाऱ्या वाहन चालकांवर थोटावण्यात आला दंड
प्रतिनिधी पांडुरंग माने
रायगड (गोरेगाव) :- दि. १२ जून गोरेगाव पोलीस स्टेशन कडून गोरेगाव बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला कसेही बेकायदेशीर वाहने उभी करून वाहतुकीला अडचण निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर गोरेगावं गोरेगावं पोलीस स्टेशन कडून कारवाई करण्यात आली तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला गोरेगाव बाजारपेठे नेहमीच गजबजलेली असते परंतु काही वाहन चालक आपले वाहन रस्त्या उभे करून इकडे तिकडे जात असतात याचवेळी रस्त्यावरून 
येणारे इतर वाहनांना याचा त्रास होतो यामुळे मुख्य बाजारपेठ च्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दररोज होत असते त्याचप्रमाणे भाजीपाला तसेच फळांच्या हात गाडयांवर धंदा करणाऱ्या विक्रेत्यांनी नियमांची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे साहेब यांनी कडक शब्दात सूचना केल्या आहेत हे तसेच अशा धडक कारवाया दररोज करण्यात येतील तसेच गोरेगाव व्यापारी संघटना आणि गोरेगावं ग्रामपंचायत ने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













