नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पनवेल महानगरपालिकेने स्व मालकीचे प्रभाग निहाय किमान ५०० बेडस असलेले सार्वजनिक व माता बाल रुग्णालय बांधणेबाबत प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी. – आजचा महाराष्ट्र

पनवेल महानगरपालिकेने स्व मालकीचे प्रभाग निहाय किमान ५०० बेडस असलेले सार्वजनिक व माता बाल रुग्णालय बांधणेबाबत प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.

प्रतिनिधी

रायगड (पनवेल) :- पनवेल महानगर पालिकेच्या स्थापना नोव्हेंबर २०१६ साली झाली असून सन २०११ च्या जनगणनानुसार पालिकेची लोकसंख्या ही ५ लक्ष होती, सध्या ती लोकसंख्या ८ लाखाच्या घरात गेली असल्याचा अंदाज आहे. तसेच महानगर पालिकेला ८ वर्ष पूर्ण झाली, परंतु पालिका हद्दीतील सर्व सामान्य जनतेला दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध मिळावी या मागणी करिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक ९/०६/२०२५ रोजी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची प्रहारच्या शिष्टमंडळाने भेट घेवून पनवेल पालिकेने पालिकेच्या मालकीचे सार्वजनिक व माता

बाल रुग्णालय बांधणे आवश्यक आहे याबाबतची चर्चा केली अशी माहिती सुनील शिरीषकर,उपाध्यक्ष रायगड प्रहार जनशक्ती पक्ष यांनी दिली. तसेच सर्व सामान्य जनतेला शहरातील खाजगी रुग्णालय यांच्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . सदर महानगरपालिकेचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे प्रभाग निहाय आहे, परंतु या ठिकाणी गंभीर उपचारासाठी आणि मोठ्या शस्रक्रिया पार पाडण्यासाठी सार्वजनिक व माता बाल रुग्णालय या प्रमाणे आवश्यक असणारे आत्याधुनिक साहित्य व मोठ्या मशनरी आणि साधन सामुग्री नसल्या कारणाने नागरिकांना शहरातील खाजगी आरोग्य व्यवस्था यांच्यावर विसंबून राहावे लागते या बाबीकडे प्रहारने लक्ष वेधले. सदर आरोग्य सेवा ही प्राथमिक व मूलभूत गरज असताना पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे, म्हणून पनवेल पालिकेने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रभाग निहाय किमान ५०० बेडस असलेले सुसज्ज Multi-Specialist असे सार्वजनिक व माता बाल रुग्णालये बांधणेबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागणी केली यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळात सुनील शिरीषकर, adv. मनोज टेकाडे, adv. अजय तापकिर, राहुल तेलंग आदि पदाधिकारी उपस्थित होते असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.   

कोट – सदर पनवेल पालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या पक्षांनी यावर आवाज भूमिका घेतली नाही ही शोकांतिका आहे. तसेच पनवेल पालिकेचे मालकीचे सार्वजनिक व माता बाल रुग्णालय नसल्याने त्याचा आर्थिक फटका हा शहरातील सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. तसेच पालिका हद्दीत साधारण २०० पेक्षा जास्त खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असल्याने ते मनमानी पद्धतीने रुग्णांकडून शुल्क आकारून आर्थिक पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे, म्हणून पालिकेचे स्वताची आरोग्य व्यवस्था उभारावी ही मागणी करण्यात आली आहे.सुनील शिरीषकर उपाध्यक्ष, रायगड जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]