नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा. – आजचा महाराष्ट्र

शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा.

प्रतिनिधी  विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि १०)शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून मुकरीची वाडी आणि लालवाडी करंजाडे मध्ये सामाजिक बांधिलकी जपत भव्य शालेपयोगी किट चे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.या मध्ये प्रामुख्याने मुलांना बॅग वह्या पेन पेन्सिल कंपास पेटी अश्या वस्तूंचे वाटत करण्यात आले.वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.ह्या कार्यक्रमास महिला मंडळ पदाधिकारी सुषमा

मयेकर, ज्योती टोटरे,प्रियांका ठाकूर, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील, उपाध्यक्ष प्रशांत निर्मळ, संदीप पाटील, मनीष कटेकर, राकेश कुसले, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, प्रशांत शेट्टी, सुरेश बार्वे,अमर कुसळे,अमर सावंत,अक्षय मोरे,सिद्धार्थ अंबावडे,समीर कांबळे,राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आल्याने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]