रोहा तहसील कार्यालयातील सार्वजनिक शौचालय दुर्दशेत – स्वच्छ भारत अभियानाची फसवणूक
प्रतिनिधी
रायगड (रोहा) :- ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवला जात असतानाही रोहा तहसील कार्यालयातील सार्वजनिक शौचालयाची स्थिती अत्यंत वाईट असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक बनली आहे. तहसील कार्यालयासमोरील शौचालयाची बाह्य व अंतर्गत स्थिती पाहता, ती साफसफाईपासून कोसों दूर असल्याचे चित्र दिसून येते.शौचालयाच्या बाहेर झाडी, गवत आणि वेली वाढलेल्या असून, प्रवेशद्वारावर गंजलेले रेलिंग आणि मोडकळीस आलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. आतील भागात अस्वच्छता, दुर्गंधी, तोडफोड व बिघडलेली सांडपाणी व्यवस्था हे चित्र सामान्य झाले आहे. युरिनल आणि कमोड दोन्ही वापरण्याच्या 
अयोग्य स्थितीत असून, नळ, फ्लश आणि स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा नादुरुस्त आहेत. भिंती व टाईल्सवर काळेपणा व बुरशीही स्पष्ट दिसते.नियमित देखरेख व स्वच्छतेचा अभाव स्पष्ट असून, महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा असूनही तिचा देखील अत्यंत हलाखीचा स्थितीमुळे वापर करणे कठीण बनले आहे. स्वच्छतागृहाची दारे नीट बंद न होणे ही समस्या अधिक गंभीर आहे.स्थानिक नागरिक आणि तहसील कार्यालयात येणारे नागरिक चर्चा करता वेळी दिसत आहेत .सार्वजनिक स्वच्छतागृहाची त्वरित दुरुस्ती करावी, नियमित साफसफाईचे नियोजन करावे आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीनेही सुधारणा करावी.या भागातील स्वच्छतेच्या प्रश्नांकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची चर्चा आहे. तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जर ही स्थिती असेल, तर ग्रामीण भागातील सुविधा काय असतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.‘स्वच्छ भारत’चा नारा फक्त कागदावर उरतो की काय? प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













