श्याम म्हात्रे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमाचे पनवेल मध्ये आयोजन
प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे
अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे श्रुती म्हात्रे यांचे आवाहन
रायगड (उरण) :- दि.८ काँग्रेस पक्षाचे दिवगंत नेते श्याम पदाजी म्हात्रे यांची सातवी पुण्यतिथी ९ जून रोजी आगरी शिक्षण संस्था, सेक्टर ६,खांदा कॉलनी पनवेल येथे साजरी होणार असून दिवंगत श्याम म्हात्रे यांना अभिवादन करण्यासाठी, म्हात्रे साहेब यांचे समर्थक, म्हात्रे साहेबांवर नितांत प्रेम करणारे तर कामगार वर्ग, राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,कला,क्रीडा, हरिभक्त दासगन क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी केले आहे.रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील बेलपाडा गावात जन्म झालेल्या शाम म्हात्रे यांचा राजकीय प्रवास अतिशय संघर्षमय राहिला. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या अमोघ वाणीने आणि प्रचंड इच्छाशक्ती व जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी राजकारणात सर्वोच्च स्थान निर्माण केले होते.काँग्रेस पक्षाची बुलंद तोफ,पक्षाची धुरा 
वर्षानुवर्षे खांद्यावर घेत अनेक पद त्यांनी भूषविली होती.कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक लढे दिले होते, पोलिसांच्या पिंजाऱ्यातही बसावं लागलं होत,नव्हे काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी,पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी उरण विधानसभा मतदार संघाची निवडणुकही लढाविली होती.गरीब कष्टाकरी प्रकल्पग्रस्त कामगार यांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले.त्यांचा जीवन प्रवास संपल्यानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी कामगारांना न्याय हक्क देण्यासाठी त्यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी ही जबादारी घेऊन आजही कामगारांना न्याय देण्यासाठी आंदोलणे, मोर्चे करताना दिसत आहेत. आजही म्हात्रे साहेबांना सात वर्ष जाऊनही मात्र त्यांच्या आठवणी त्यांच्यातून काही सरता सरत नाही आजही भावुक होताना त्या दिसत आहेत, त्यांच्या आठवणी निरंतर स्मरणात राहण्यासाठी सातवा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच कर्करोग विषयी जनजागृती व्याख्यानाचे आयोजन, झुनझुनवाला आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबीर करण्यात आले असून सदरसकाळी दहा वाजता आगरी शिक्षण संस्था, सेक्टर ६,खांदा कॉलनी, पनवेल येथे सकाळी १० वाजता सदर कार्यक्रमाची सुरुवात होणार असून कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रुती म्हात्रे यांनी केले आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













