जेष्ठ नागरिकांसाठी मोफत फिरती फिजिओथेरपी सुविधा – भांडूप पूर्व येथे डिग्निटी फाउंडेशन व रोटरी क्लबचा उपक्रम
प्रतिनिधी सतिश वि. पाटील
मुंबई :- डिग्निटी फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील गरजू व ५५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत दि. २ जून ते ६ जून २०२५ दरम्यान शिवसेना शाखा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), उदयश्री मार्ग, भांडूप (पूर्व) येथे फिरता दवाखाना आयोजित करण्यात आला होता.या उपक्रमात 
सकाळी १०:०० ते दुपारी १:०० आणि २:०० ते ४:०० या वेळेत मर्यादित रुग्णांना फिजिओथेरपी सेवा देण्यात आल्या. या सेवेमुळे मानदुखी, संधिवात, गुडघेदुखी, टाचदुखी, कोपरदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदा दुखी अशा त्रासांमधून त्रस्त असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला.फिजिओथेरपी ही वृद्धांच्या वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक समस्यांवर प्रभावी उपचार पद्धती ठरते. यामुळे शरीर अधिक मजबूत, लवचिक व संतुलित राहते. डिग्निटी फाउंडेशन १९९५ पासून ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक, सामाजिक व आरोग्यविषयक गरजांवर काम करत आहे. त्यांच्या एकटेपणाला विराम देत त्यांचे जीवन अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न फाउंडेशन करत आहे.संपर्कासाठी:लक्ष्मण पवार – ७७३८३३३२२९ काजरोळकर – ८८५०३०१३४६ भारत मोकल – ९००४९०९३२२ / ०२२-६१३८११००पत्ता: डिग्निटी फाउंडेशन, बी-२०६, दुसरा माळा, भायखळा सेवा उद्योग, दादोजी कोंडदेव मार्ग, भायखळा (पुर्व), मुंबई – ४०००२७
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













